Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Mumbai Khar Car Accident : मुंबईतील खार पश्चिमेत भरधाव कारने मोटरसायकलला मागून धडक दिल्याने पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी आणि अन्य स्कूटीस्वार जखमी झाले. या प्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Khar Car Accident
Mumbai Khar Car Accidentसाम टीव्ही मराठी
Published On: 

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील खार पश्चिमेत सुसाट वेगाने आलेल्या कारने मोटरसायकलला मागून दिलेल्या जोरदार धडकेत पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. याच कारच्या धडकेत आणखी एक स्कूटीस्वारही जखमी झाला. अंगावर काटा आणणारी ही घटना २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सी.डी. रोड आणि १६व्या रोडच्या जंक्शनवर घडली.

इयाप्पन सेल्वराज हरीजन (४१) हे पत्नी नॅन्सी इयाप्पन हरीजन (३७) यांच्यासोबत मोटरसायकलवरून वांद्र्याच्या दिशेने जात होते. इयाप्पन यांनी हेल्मेट घातले होते. त्याचवेळी मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या MH 01 ER 2822 कारने त्यांच्या MH 02 FZ 1444 मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडकेने नॅन्सी रस्त्यावर फेकल्या गेल्या, तर इयाप्पन थेट कारखाली अडकले.

Mumbai Khar Car Accident
CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

अपघाताचा थरार पाहून घटनास्थळी धावलेल्या नागरिकांनी कार उचलून इयाप्पन यांना बाहेर काढले. त्यांच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली होती. कानाजवळून रक्तस्राव होत होता. नॅन्सी यांच्या हातालाही दुखापत झाली. दोघांना तातडीने भाभा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी इयाप्पन यांना मृत घोषित केले.

Mumbai Khar Car Accident
Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

दरम्यान, याच कारच्या धडकेत अन्य एका स्कूटीस्वारालाही दुखापत झाली असून त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. कार चालक सुधीर सिताराम सावंत (७१) यांच्याविरोधात खार पोलिसांनी BNS कलम १०६(१), १२५(a), १२५(b), ३२४(४), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या भीषण अपघाताचा पुढील तपास खार पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com