CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

Kathua CISF firing : जम्मू-काश्मीरमधील कठुआच्या CISF कॅम्पमध्ये गोळीबाराची घटना घडली. चार CISF जवानांचा मृत्यू झाला असून घटनेच्या कारणाचा तपास सुरू आहे. CISF कडून कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.
Kathua CISF firing  death toll
Kathua CISF firing death toll
Published On: 

Kathua CISF camp firing four personnel killed : जम्मू-काश्मीरमधील कठुआत CISF कॅम्पमध्ये एका जवानानं सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ४ जवानांचा मृत्यू झालाय. हा गोळीबार का करण्यात आला? यामागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. या घटनेची चौकशी सुरू आहे.

गोळीबार प्रकऱणी सीआयएसएफ मुख्यालयातून कोर्ट ऑफ इन्क्वॉयरीचे आदेश देण्यात आलेत. आज संध्याकाळी साधारण ७ वाजून १० मिनिटांनी ही घटना घडली. कठुआ जिल्हा पोलिसांचं एक पथक घटनास्थळी पोहोचलंय. मृत्यू झालेल्या चार जणांमध्ये असिस्टंट कमांडंट रँकच्या अधिकाऱ्याचा आणि एका सब-इन्स्पेक्टरचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Kathua CISF firing  death toll
Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

गोळीबाराची ही घटना बसोली येथील मश्का भागातील सेवा पॉवर प्रोजेक्टच्या सीआयएसएफ कॅम्पमध्ये घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केलाय. प्राथमिक माहितीनुसार, जवानांमध्ये ड्युटी लावण्यावरून बाचाबाची झाली होती. हा वाद इतका विकोपाला गेली की याचं रूपांतर गोळीबारात झाले.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना एका वीज प्रकल्पाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या सीआयएसएफ (CISF) तुकडीच्या छावणीत घडली. गोळीबारात चारही सैनिक गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण उपचारावेळी मृत्यू झाला.

Kathua CISF firing  death toll
१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

घटनेची माहिती मिळताच, कठुआ जिल्हा पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार कधी झाला, किती गोळ्या झाडण्यात आल्या आणि घटनाक्रम काय होता? याचा तपास पोलीस करत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या जवानांमध्ये कॉन्स्टेबल रफीक अहमद, कॉन्स्टेबल संदीप कुमार, असिस्टंट कमांडंट अंकित कुमार पांडे आणि सब-इन्स्पेक्टर लक्ष्मण सिंग यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com