Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Bhandara Accident: भंडाऱ्यामध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये उपसरपंचाचा जागीच मृत्यू झाला. रामटेक-गोंदिया महामार्गावर ही घटना घडली. कारने दुचाकीला धडक दिली.
Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...
Bhandara Accident Saam
Published On
  • भंडाऱ्यात उपसरपंचाचा अपघातात मृत्यू

  • रामटेक- गोंदिया महामार्गावर घडली घटना

  • भरधाव कारने दुचाकीला उडवलं

  • तुमसरजवळ गावकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन

भंडाऱ्यातील तुमसरजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली. कारच्या धडकेत काटेबाम्हणीच्या उपसरपंचांचा जागीच मृत्यू झाला. रामटेक-गोंदिया महामार्गावर ही घटना घडली. या अपघातानंतर गावकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढल पुन्हा वाहतूक सुरळीत केली.

मिळालेल्या माहितीनुसार, रामटेक-गोंदिया महामार्गावरील काटेबाम्हणी गावाजवळ आज संध्याकाळच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघाताची घटना घडली. एका सुसाट कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत काटेबाम्हणी येथील उपसरपंचाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी महामार्गावर रास्तारोको केल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...
Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास भगवान कचरू आगाशे (वय ४० वर्षे, रा. काटेबाम्हणी) हे आपल्या दुचाकीने जात होते. दरम्यान, रामटेक महामार्गावर एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, भगवान आगाशे यांचा घटनास्थळावरच वेदनादायक मृत्यू झाला. मृतक भगवान आगाशे हे काटेबाम्हणी गावचे विद्यमान उपसरपंच होते.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...
Accident News : भीषण दुर्घटना! धावत्या कारने घेतला पेट; माजी सरपंचासह कुटुंबातील ४ सदस्यांचा होरपळून मृत्यू

आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधीचा अपघातात नाहक बळी गेल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर संतप्त झालेल्या शेकडो गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संतापलेल्या जमावाने रामटेक-गोंदिया महामार्गावर ठिय्या मांडत वाहतूक पूर्णपणे रोखून धरली. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परंतू, उपसरपंचांच्या अचानक जाण्याने संपूर्ण काटेबाम्हणी गावावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप होता. पोलिसांनी गावकऱ्यांचे समजूत काढत महामार्ग पुन्हा सुरळीत केला. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...
Pandharpur Accident: आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनला भीषण अपघात, ३ जण गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com