दिवाळीमध्ये सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहे. आज दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. सोन्याचे दर घसरल्यामुळे आज खरेदीची सुवर्णसंधी आहे. आज दिवाळी पाडवा असल्यामुळे नवरा-बायको एकमेकांना सोन्याचे गिफ्ट भेट देऊ शकता. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ४९० रुपयांची घसरण झाली. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी दर किती आहेत ते वाचून जा...
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४- २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४९० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४४११० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४,९०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १४,४१,१०० रुपये खर्च करावे लागतील.
आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४५० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३२,१०० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ४,५०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १३,२१,००० रुपये मोजावे लागतील.
२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटचे सोनं देखील स्वस्त झालं आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ३७० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,०८,०८० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,७०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १०,८०,८०० रुपये खर्च करावे लागतील. दरम्यान, आज सोनं स्वस्त झालं पण चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. आज १ ग्रॅम चांदी २०५ रुपयांना विकली जात आहे. तर १ किलो चांदी २,०५,००० रुपयांना खरेदी करावी लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.