Manasvi Choudhary
डायबिटीज असलेल्या रूग्णांनी आहाराची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. गोड पदार्थ्यांचे सेवन कमी केले पाहिजे.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी साखरेऐवजी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु गुळ खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
गूळ हा पांढऱ्या साखरेपेक्षा अधिक नैसर्गिक मानला जातो कारण साखरेप्रमाणे त्यावर प्रक्रिया केलेली नसते. त्यामुळे गुळामध्ये साखरेच्या तुलनेत काही खनिजे असतात. परंतु, डायबिटीजच्या दृष्टीने विचार केल्यास गूळ आणि साखर दोन्हीचे शरीरावर परिणाम होतात.
गूळ प्रामुख्याने सुक्रोज पासून बनलेला असतो. शरीर गुळाचे विघटन साखरेप्रमाणेच करते. त्यामुळे जरी गूळ खाल्ल्याने लगेच ऊर्जा मिळत असली, तरी रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवू शकते. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांनी गुळाचे सेवन अत्यंत मर्यादित प्रमाणात करावे.
गुळामध्ये साखरेसारखी कमी कॅलरीज नसले तरी उसाच्या रसापासून बनलेल्या गुळामध्ये लोह आणि मॅग्नेशियम ही खनिजे असतात, जी शरीरासाठी फायदेशीर असतात. शरीराला पोषण देतात.
बाजारात मिळणाऱ्या गुळामध्ये रासायनिक प्रक्रिया किंवा रंगाची भेसळ असू शकते. त्यामुळे नेहमी गडद रंगाचा, सेंद्रिय आणि चांगल्या दर्जाचा गूळ खरेदी करावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.