BMC Saam Tv
मुंबई/पुणे

BMC News: मुंबईत रस्त्याच्या कडेला कार पार्क कराल तर खबरदार!

Mumbai Municipal Corporation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुंबईतील अवैध पार्किंग समस्‍येची तीव्र दखल घेतलीय. ठरवलेले वाहन तळ सोडून अन्यत्र कोठेही वाहने उभी केल्‍याने वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्‍य नागरिकांची गैरसोय होते. ही समस्‍या मार्गी लावण्‍याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

Bharat Jadhav

BMC Action On Illegal Parked Vehicle:

मुंबई महानगरातील रस्त्यांच्या कडेला अवैधरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. रस्त्यांच्या बाजुला वाहने उभी केल्याने वाहतुकीला अडथळा होत असतो. अवैधरित्या वाहने पार्क केल्याने ट्रॉफिक होत असते, या समस्येपासून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी मुंबई पालिका अ‍ॅक्शन मोडवर आलीय.(Latest News)

संपूर्ण स्‍वच्‍छता मोहिमेच्‍या नियोजनाची आणि पूर्व तयारीची आढावा बैठक आज महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अवैधरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुंबईतील अवैध पार्किंग समस्‍येची तीव्र दखल घेतलीय. ठरवलेले वाहन तळ सोडून अन्यत्र कोठेही वाहने उभी केल्‍याने वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्‍य नागरिकांची गैरसोय होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चालणेही दुरापास्‍त होते आणि वाहनांच्या आजुबाजूला कचरा निर्माण होतो. ही समस्‍या मार्गी लावण्‍यासाठी विभाग स्तरावर मार्शल्‍सची नेमणूक करा, असे निर्देश मुख्‍यमंत्र्यांनी दिलेत. त्यानुसार विभाग पातळीवर मार्शल्‍सची नेमणूक करण्‍यात येईल, असेही चहल यांनी या बैठकीत स्‍पष्‍ट केलं.

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिकेने सक्त मार्गदर्शक तत्वे तयार करून सर्व घटकांपर्यंत ती पोहोचवली तसेच त्याची योग्य अंमलबजावणी केली. याचा परिणाम म्हणून मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणात आले आहे. महानगरपालिकेच्या या कामकाजाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील समाधान व्यक्त केले आहे. याच धर्तीवर आता संपूर्ण स्वच्छता मोहिमेची मार्गदर्शक तत्वे तयार करून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे सर्व यंत्रणांनी लक्ष द्यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिलेत.

सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या कामकाजाचा आढावाही आयुक्तांनी घेतला. मुंबईत विविध ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृह पुनर्बांधणी करण्‍याची महानगरपालिकेची कामे सुरू आहेत. त्‍या बांधकामांचा वेग वाढवा. पुनर्बांधणीचे काम विहीत कालावधीत पूर्ण न करणऱ्या आणि कुचराई अथवा मनमानी करणाऱ्या कंत्राटदाराला प्रसंगी काळ्या यादीत टाका, असे सक्त निर्देशही आयुक्तांनी दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

SCROLL FOR NEXT