Ajit Pawar News : चैत्यभूमीवर आलेल्या अजितदादांनी अधिकाऱ्यांना झापलं, BMC आयुक्तांनाही लावला फोन, नेमकं काय झालं?

Ajit Pawar News Update : नारळी बागेत स्वच्छता नसल्यामुळे अजित पवार यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि इतर अधिकाऱ्यांना झापलं आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSaam TV
Published On

Mumbai News :

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने भीमसागर चैत्यभूमीवर एकवटला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी देखील चैत्यभूमीवर दाखल होत महामानवाला अभिवादन केले आहे.

इतर मान्यवरांची वाट पाहत असताना अजित पवार यांनी चैत्यभूमीवरील विव्हिंग डेकची पाहणी करत फेरपटका मारला. नारळी बागेत स्वच्छता नसल्यामुळे अजित पवार यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि इतर अधिकाऱ्यांना झापलं आहे.

Ajit Pawar
Maratha Reservation: मराठा आरक्षण वैध की अवैध? आज अंतिम फैसला; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

अजित पवार चैत्यभूमीवर दाखल झाल्यानंतर स्थानिक नागरिक अजित राणे यांनी नारळी बागेतील अस्वच्छतेबाबत त्यांच्याकडे तक्रार केली. नारळी बागची अवस्था खूप खराब आहे, असे राणे यांनी सांगितलं. तसेच एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे, पण स्वछता नाही आणि झाडांना पाणी घातले जात नाही, अशी तक्रार त्यांनी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तक्रारीनंतर अजित पवार यांनी तातडीने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना फोन लावला आणि याबाबत विचारणा केली. त्यावेळी आयुक्तांना मी पाहतो, असं उत्तर दिलं. यानंतर इतर अधिकाऱ्यांना देखील अजित पवार यांना जाब विचारला. 1 कोटीचा निधी देऊन व्यवस्थित काम झाले नाही म्हणून अजितदादांना अधिकाऱ्यांना झापले. (Latest Marathi News)

Ajit Pawar
Mumbai News: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’, राज्य सरकारचे काय आहे हे अभियान? जाणून घ्या

चैत्यभूमीवर चोख बंदोबस्त

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होतात. या सर्वांसाठीं तात्पुरता निवारा, सीसीटीव्ही कॅमेरे, LED टीव्ही, हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. तसेच मुंबई पोलिसांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू त्यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २५० अधिकारी, २००० कर्मचारी, सीआरपीएफ च्या ९ तुकड्या, आरपीएफचे जवान, दंगल नियंत्रण पथक, हरवणाऱ्या वृद्ध आणि लहान मुलांना शोधण्यासाठी पथके, सोबत समता सैनिक दलाचे १८ हजार जवान हे नियोजनात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com