Nagpur Hiwali Adhiveshan 2023 Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे नुकसान पाहणी दौऱ्यावर रवाना

Nagpur Assembly Winter Session 2023 (Day 1) Breaking News & Live Updates: देश विदेश तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर.
Nagpur Assembly Winter Session 2023 Live Updates Breaking News in Marathi by Saam Tv
Nagpur Assembly Winter Session 2023 Live Updates Breaking News in Marathi by Saam TvMaharashtra Hiwali Adhiveshan 2023 Live Newsin Marathi- Saam TV
Published On

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे नुकसान पाहणी दौऱ्यावर रवाना

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे नुकसान पाहणी दौऱ्यावर रवाना झाले आहे.

विधानपरिषदेतील शिंदे गटात गेलेल्या आमदारांबाबत सुनावणी घेतली जात नसल्यामुळे ठाकरे गट आक्रमक

विधानपरिषदेतील शिंदे गटात गेलेल्या आमदारांबाबत सुनावनी घेतली जात नसल्यामुळे ठाकरे गट आक्रमक. उपसभापती निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे आणि विप्लव बजोरिया या आमदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत केला होता प्रवेश. या प्रकरणी अनिल परब यांनी कोर्टात याचिका दाखल करणार. या तिघांच्या अपात्रतेबाबत सुनावनी घेत नसल्याबाबत अनिल परब यांनी विधीमंडळ कामकाज बैठक मुद्दा उपस्थित केला.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन तासाचा ब्लॉक

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गॅन्ट्री बसवण्यासाठी दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला. यावेळी गॅन्ट्री बसवण्यात येतेय, युद्ध पातळीवर हे काम सुरू असून यासाठी किवळे या ठिकाणाहून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वाहतूक वळवण्यात आली आहे.

काँग्रेस आमदाराला सुरक्षा पुरवणार, नाराजीनंतर देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन

काँग्रेस आमदार राजेश राठोड यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, गुरुवारी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दिली. सुरक्षेच्या मागणीवर कार्यवाही न झाल्याने राठोड यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर फडणवीस यांनी हे आश्वासन दिले.

स्वाभिमानीच्या लढ्याला यश, २५ टक्के अग्रीम रक्कम जमा होण्यास सुरुवात

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याच्या अग्रीम पोटी २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील तीन महिन्यांपासून दिलेल्या लढ्याला यश आले आहे. पुढील पाच दिवसात वाशिम जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही अग्रीम रक्कम जमा होणार आहे. शेवटच्या शेतकऱ्याला पैसे मिळेपर्यंत नागपूर उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका परत घेणार नाही अशी भूमिका स्वाभिमानीकडून जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Cabinet Expansion: हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होणार, कुणाला मिळणार मंत्रिपदं?

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. नव्या विस्तारात अजित पवार गटाला आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद आणि दोन राज्यमंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाकडून मकरंद आबा पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Nagpur Hiwali Adhiveshan: नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 3 मोर्चे 17 धरणे आंदोलन

आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. पहिल्याच दिवशी यशवंत स्टेडियमवर विविध मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 17 धरणे आंदोलन होणार आहेत. तसेच 5 साखळी उपोषण, 4 उपोषण आणि एक ठिय्या आंदोलन होणार आहे. यासोबतच सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी दिव्यांगांच्या शाळेसाठी अनुदान, समग्र कर्मचाऱ्याने नोकरित कायम करावे, सफाई मजदूर काँग्रेसचे असे तीन मोर्चे विधान भवनात धडकणार आहेत.

Nawab Malik in Nagpur Hiwali Adhiveshan: नवाब मलिक अधिवेशनात सहभागी होणार, कोणत्या गटात बसणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे. कामकाजात सहभागी होताना नवाब मलिक नेमके कोणत्या गटासोबत बसणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. विशेष म्हणजे अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर नवाब मलिक यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या आमदारांची वेगवेगळी बसण्याची व्यवस्था होणार नाही. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीत गट म्हणुन अद्याप दोन्हीं नेत्यांना मान्यता नसल्याने सर्व आमदार एकत्रित बसण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Winter Session 2023: अधिवेशनात अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड एकाच कार्यालयात बसणार

महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. यंदाचे अधिवेशन हे वादळी ठरण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

महत्वाची बाब म्हणजे, अधिवेशनात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि शरद पवार गटाचे नेत्यांना एकच कार्यालय देण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही गटातील नेत्यांना एकत्र बसावं लागणार आहे. नागपूर विधानभवन परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जितेंद्र आव्हाड आणि अजित दादा यांची नेमप्लेट लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com