BMC Budget 2023 : काय म्हणाले इक्बाल सिंह चहल ?; वाचा महत्वाचे मुद्दे

महापालिकेने विक्रमी 52 हजार 619 कोटीचं बजेट सादर केलं आहे.
BMC Budget 2023
BMC Budget 2023Saam TV
Published On

BMC Budget 2023 : आज मुंबई महानगरपालिकेचा 2023-24 अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेला 50 हजार कोटींहून जास्त तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच मुंबईकरांचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले होते.

देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या इतिहासात 38 वर्षांत पहिल्यांदाच प्रशासकाने अर्थसंकल्प सादर केला आहे. महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील काही प्रमुख मुद्दे जाणून घेऊ.

यावर्षी अर्थसंकल्पासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेने विक्रमी 52 हजार 619 कोटीचं बजेट सादर केलं आहे.

आरोग्य विभाग

  • आरोग्य सुविधांसाठी ₹6309.38 कोटी इतका खर्च असून तो एकूण अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 12%.

  • भगवती रुग्णालयाचा पुनर्विकासाठी ₹110 कोटी.

  • गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयाचं बांधकाम करण्यासाठी ₹110 कोटी.

  • एम. टी. अगरवाल रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यासाठी ₹95 कोटी.

  • कांदिवली (प) येथे असलेल्या शताब्दी रुग्णालयाच्या बांधकामासाठी ₹75 कोटी.

  • सायन रुग्णालयाच्या इमारतीचे पुनर्विकास काम यासाठी ₹70 कोटी.

  • भांडूप येथील एस विभाग प्रस्तावित मल्टी स्पेशालिटी महानगरपालिका रुग्णालयाच्या कामासाठी ₹60 कोटी.

  • वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयाच्या विस्तारीकरणच्या कामासाठी ₹53.60 कोटी.

  • कृष्ठरोग रुग्णालयाच्या आवारात वसतीगृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी ₹28 कोटी.

  • ₹17.50 कोटी नायर दंत महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी.

  • ई विभागच्या कामाठीपुरा येथील सिद्धार्थ, मुरली देवरा नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकास ₹12 कोटी.

  • ₹7 कोटी के.ई.एम. रुग्णालयातील प्लाझ्मा सेंटरची दर्जोन्नतीसाठी.

  • आर. एन. कूपर रुग्णालय महाविद्यालयाचे बांधकाम करण्यासाठी ₹5 कोटी.

  • हाजीअली वसतीगृहाचे बांधकाम ₹2 कोटी. यात टाटा कंपाऊंडचा समावेश आहे.

  • के. ई. एम. रुग्णालयामध्ये प्रोटॉन थेरेपी आणि कर्करोग रुग्णालयाच्या बांधकामासाठी ₹1 कोटीची तरतूद आहे.

एमएसडीपी ₹3566.78 कोटी

  • पाणी पुरवठा प्रकल्पासाठी ₹1376 कोटींची तरतूद.

  • जल अभियंतामध्ये ₹780 कोटी.

  • मलनिःसारण प्रचालनासाठी ₹364 कोटींची तरतूद.

  • जलवहन बोगद्यांची बांधकामे ₹433 कोटींची तरतूद.

  • द.ल.लि. 2000 प्रतिदिन क्षमतेचा नविन जलशुध्दीकरण प्रकल्प तयार करण्यासाठी ₹350 कोटी

  • कुलाबामधील 'आधुनिक तृतीय स्तर जल प्रक्रीया केंद्र' यासाठी ₹32 कोटी.

महत्वाचे मुद्दे

- पायाभूत सोयीसुविधांवर देखील मोठ्या प्रमाणात खर्च होणार.

- ५२ टक्के खर्च विकासावर तर ४८ टक्के इतर गोष्टींवर.

- पहिल्यांदाच ५० टक्क्यांच्यावर निधी खर्च.

- महसूलात मोठी वाढ.

- मुंबईतल्या नद्यांचे पुनर्जीवन करण्याकडे लक्ष.

- फुटपाथसाठी नवी धोरण लवकच सुरू होणार.

- मुंबईमध्ये ९ मीटरपेक्षा जास्त लांब रस्ता असल्यास दोन्ही बाजूने फुटपाथ बंधनकारक.

- मुंबईतील सर्व रस्ते पुढील २-३ वर्षात काँक्रिटीकरणाचे.

- आरोग्यासाठी ६ हजार ३०० कोटी.

- प्रकल्पांवर पैसे कसे खर्च करणार

- 11 हजार कोटी GST मधून मिळणार

- 5-6 कोटी प्रॉपर्टी टॅक्स BMC ला मिळणार

- इन्फ्रा फड 15 हजार 600 कोटी जमा झाला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com