Mumbai Local Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मुंबईत धावत्या लोकलमधून प्रवाशाला ढकललं, गंभीर जखमी तरुणाचा तडफडून मृत्यू

Mumbai Crime: मुंबईमध्ये भयंकर घटना घडली. धावत्या लोकलमधून तरुणाला ढकलून देण्यात आले. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला.

Priya More
  • मुंबईमध्ये धावत्या लोकलमधून तरुणाला ढकलण्यात आले

  • चर्चगेट-बोरीवली लोकलमध्ये किरकोळ वादानंतर घडली घटना

  • वांद्रे खाडीजवळ प्रवाशाला धावत्या ट्रेनमधून ढकलले

  • तरुणाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला

संजय गडदे, मुंबई

मुंबईमध्ये धावत्या लोकलमधून तरुणाला ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना चर्चगेट-बोरिवली लोकलमध्ये घडली. अपंगांच्या डब्यात किरकोळ कारणावरून प्रवाशांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान तरुणाला लोकलबाहेर ढकलून देण्यात आले. या घटनेमुळे मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. सध्या रेल्वे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेट-बोरिवली लोकलमध्ये आज दुपारच्या सुमारास भयंकर घटना घडली. एका व्यक्तीला धावत्या लोकलमधून ढकलून देण्यात आले. वांद्रे खाडीवर लोकल आली असताना ही घटना घडली. अपंगांच्या डब्यात हा तरुण प्रवासी चढला होता. यावेळी प्रवाशांमध्ये किरकोळ वाद झाला आणि या वादातून हा भयानक प्रकार घडला. त्या प्रवाशाने तरुणाला धावत्या ट्रेनमधून धक्का दिला. त्यामुळे तरुण वांद्रे खाडी पुलावर पडला.

धावत्या लोकलमधून खाली पडल्यामुळे तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी तरुणाला तात्काळ वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. तरुणाची प्रकृती चिंताजनक होती. पण रुग्णालयात पोहचेपर्यंत त्याचे प्राण गेले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे वांद्र्यात एकच खळबळ उडाली. धक्का देणाऱ्या व्यक्तीला वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी सांगितले की, वांद्रे-माहिमदरम्यान धावत्या लोकलमधून प्रवाशाला धक्का देण्यात आला. चर्चगेटहून बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये हा प्रकार घडला. आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास लोकल वांद्रे रेल्वे स्थानकात दाखल झाल्यानंतर प्रवाशांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी संबंधित जखमी व्यक्तीला तातडीने भाभा रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

अमजद सफरुद्दीन शेख (वय ४८ वर्षे) असे आरोपीचे नाव असून त्याने तरुणाला धक्का दिल्याचा प्राथमिक आरोप आहे. अमजद शेख हा चर्चगेट पूर्वेकडील दर्ग्याजवळील फुटपाथवर राहत असल्याची माहिती आहे. लोकलच्या डब्यात कावळा आल्याने तो कावळा हाकलण्याचा प्रयत्न करत असल्याचे अमजदने पोलिसांना सांगितले. याच प्रयत्नात मृत व्यक्तीला धक्का लागल्याचे अमजदचे प्राथमिक म्हणणे आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाकडून पाहणी केली जाणार आहे. वांद्रे रेल्वे पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

SCROLL FOR NEXT