'पंतप्रधान माझा फोन टॅप करतात'; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

Rahul Gandhi Targets PM Modi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोन टॅपिंगचा गंभीर आरोप केला आहे. मोदींवर देशविरोधी कृत्यांचेही आरोप करत राहुल गांधींनी नेमके काय म्हटले?
Rahul Gandhi Accuses Pm Modi Of Phone Tapping | Bjp Vs Congress Political Row
Rahul Gandhi Accuses Pm Modi Of Phone Tapping | Bjp Vs Congress Political Rowsaam tv
Published On: 
Summary
  • विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले

  • पंतप्रधान मोदी माझा फोन टॅप करतात, असा दावा राहुल गांधी यांनी केला

  • राहुल गांधी यांनी मोदींवर देशविरोधी कृत्यांचेही आरोप केल्याचे वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप विरूद्ध काँग्रेस संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझा फोन टॅप करत असल्याचा खळबळजनक आरोप राहुल गांधींनी केलाय़. एवढ्यावरच राहुल गांधी थांबले नाहीत. तर मोदींवर देशविरोधी कृत्यांचाही आरोप त्यांनी केलाय. राहुल गांधींनी नेमके काय आरोप केले आहेत ते पाहूयात.

Rahul Gandhi Accuses Pm Modi Of Phone Tapping | Bjp Vs Congress Political Row
Rahul Gandhi : निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीचा 'महामोर्चा', नजर फिरेल तिथपर्यंत आंदोलक, पाहा व्हिडीओ

दरम्यान फोन टॅपिंगचा आरोप करूनच राहुल गांधी थांबले नाहीत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर चर्चेचे थेट आव्हान देत "जर माझ्यासोबत समोरासमोर थेट चर्चा झाली, तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर राहणार नाहीत.", असा इशाराही दिलाय..त्यात नाना पटोलेंनीही फडणवीसांनी आपला फोन टॅप केल्याचा आरोप केलाय. मात्र भाजपनं राहुल गांधींच्या या आरोपावर सडकून टीका केलीय. पुरावे न देता बिनबुडाचे आरोप करू नका, असा हल्लाबोल भाजपनं राहुल गांधींवर केलाय.

विशेष म्हणजे फोन टॅपिंग किंवा हेरगिरीचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी विरोधकांनी अनेकदा फोन टॅपिंगटचा आरोप केलाय.

मार्च 2021

नाना पटोले, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि इतर मविआ नेत्यांनी फडणवीस सरकारवर फोन बेकायदेशीरपणे टॅप केले जात असल्याचा आरोप केला होता

जुलै 2021

इस्रायली 'पेगासस' स्पायवेअरच्या माध्यमातून फोन टॅपिंग होत असल्याचा आरोप राहुल गांधींसह काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला होता

नोव्हेंबर 2023

तेलंगणातील बीआरएस सरकारवर

तत्कालीन विरोधी पक्षनेते रेवंत रेड्डी यांचा फोन टॅपिंगचा आरोप

Rahul Gandhi Accuses Pm Modi Of Phone Tapping | Bjp Vs Congress Political Row
राहुल गांधींच्या हातात लाल संविधान आलं कुठून? फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल

अनेक राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या पक्षांवर विरोध पक्षाच्या नेत्यांनी फोन टॅपिंगचा आरोप अनेकदा केलाय. मात्र लोकसभेच्या विरोधी पक्षांनी थेट पंतप्रधानांवरच फोन टॅपिंगचा आरोप पहिल्यांदाच केलाय. त्यामुळे दिल्लीतलं राजकारण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. आता राहुल गांधी फोन टॅपिंगच्या आरोपांसंदर्भात पुरावे कधी देणार? राहुल गांधींकडे खरचं राजकीय वर्तुळात खळबळ माजवून देणारी माहिती आहे का? यामुळे मोदी सरकार अडचणीत येणार का? आगामी संसदेचा हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजणार का? याकडे देशाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.