राहुल गांधींच्या हातात लाल संविधान आलं कुठून? फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Constitution Row: नागपुरातील 'लोकशाही वाचवा, अराजकता संपवा' मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय. राहुल गांधींच्या हातातील लाल संविधानावरून सवाल उपस्थित करत काँग्रेसवर जोरदार टीका केलीय.

नागपूरमध्ये 'लोकशाही वाचवा, अराजकता संपवा' मोहिमेदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. आम्ही बाबासाहेबांचं निळं संविधान पाहिलं, राहुल गांधींच्या हातात लाल संविधान आलं कुठून? असा सवाल करत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. हातात संविधान हातात घेऊन राज्यघटनेच्या विरोधात कामे करणं ही काँग्रेसची जुनी सवय आहे. काँग्रेसनेच आधी संविधानाची हत्या करण्याचं काम केलं. लोकशाहीला ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे. भारतीय संविधानाला डावलण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधी आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध आपण एकत्र आलो आहेत, असं फडणवीस म्हणाले. राहुल गांधी तुम्ही सांगितलं आता लढाई संसदेत नाही रस्त्यावर होईल, मात्र बाबासाहेबांचा संविधान आहे. तोपर्यंत रस्त्यावर नाही तर संसदेत लढाई असेल. आणि रस्त्यावर देखील यायला आम्ही तयार आहोत. तुम्ही शंभरच्या संख्येने याल तर आम्ही हजाराच्या संख्यने येऊ. तुम्ही हजार आला तर आम्ही एक लाख येऊ, तुम्ही लाख आला तर आम्ही एक करोड येऊ. ही लढाई भाजपसाठी नाही. तर ही लढाई देशाच्या संविधानासाठी आहे. राहुल गांधी आम्हाला रेजिम चेंज करायची म्हणतात. व्यवस्था म्हणजे भारताचा संविधान आणि त्यातून निर्माण केलेल्या संस्थेमध्ये यांना परिवर्तन करायचं आहे असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.