Actor Injured : शूटिंग दरम्यान प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; रुग्णालयात दाखल, लवकरच होणार शस्त्रक्रिया

Kartik Aaryan knee Injury : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला गंभीर दुखापत झाली असून लवकरच त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. अभिनेत्याला नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.
Kartik Aaryan knee Injury
Actor Injured SAAM TV
Published On
Summary

अ‍ॅक्शन सीन शूट करताना प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी

अभिनेत्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले

अभिनेत्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशात कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. कार्तिक आर्यनला गंभीर दुखापत झाली आहे. कार्तिक आर्यनला नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दिग्दर्शक कबीर खान यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कार्तिक आर्यनच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. एका 'ॲक्शन सीन'चे चित्रीकरण करत असताना अभिनेत्याला ही दुखापत झाली. चित्रीकरणाच्या शेवटच्या दोन दिवसांत ही घटना घडली; या काळात अनेक महत्त्वाच्या ॲक्शन दृश्यांचे चित्रीकरण नियोजित होते. अभिनेत्याच्या अपघाताची बातमी समजताच सोशल मीडियाच्या माध्यातून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे, तसेच तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

ॲक्शन सीनच्या शूटिंगसाठी कार्तिक आर्यन ॲक्शन प्रशिक्षकांकडून कठोर प्रशिक्षण घेत होता. मात्र, चित्रीकरणादरम्यान त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर त्याला उपचारांसाठी शहरातील रुग्णालयात नेण्यात आले. कार्तिक आर्यनला फोर्टिस रहेजा या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. डॉक्टर लवकरच त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यानंतर काही दिवस अभिनेत्याला विश्रांती घ्यावी लागेल.

Kartik Aaryan knee Injury
Bollywood Actor : "३ महिन्याच्या लेकीचा मृत्यू..."; प्रसिद्धीच्या शिखरावर असताना बॉलिवूड अभिनेत्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर, जुना किस्सा होतोय व्हायरल

कार्तिक आर्यन करिअर

कार्तिक आर्यन हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 'चंदू चॅम्पियन'मधील अभिनयासाठी नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्याला मिळाला आहे. कार्तिक आर्यन लवकरच 'नागझिला' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात कार्तिक आर्यन नागाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com