Pune Crime: पुणे हादरले! ७० वर्षांच्या महिलेची हत्या, शीर धडावेगळं करत फेकून दिलं

70 Years Old Woman Killed in Daund: पुण्यातील दौंडमध्ये भयंकर हत्याकांडाची घटना घडली. ७० वर्षीय महिलेची हत्या करत शीर धडावेगळं करण्यात आले. या घटनेमुळे दौंडमध्ये खळबळ उडाली.
Pune Crime: पुणे हादरले! ७० वर्षांच्या महिलेची हत्या, शीर धडावेगळं करत फेकून दिलं
Pune Crime news Saam Tv
Published On

मंगेश कचरे, बारामती

पुण्यातील दौंडमध्ये वृद्ध महिलेची हत्या करून शीर धडावेगळं केल्याची धक्कादायक घटना घडली. दौंड शहरातील आर.बी.१ नगरमोरी परिसरात ही घटना घडली. मृतदेहाची दुर्गंधी येऊ लागल्यानंतर ही हत्याकांडाची घटना उघडकीस आली. किरकोळ वादानंतर राग मनात धरून आरोपीने महिलेची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत २ आरोपींना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड शहरातील आर.बी.1 नगरमोरी परिसरात ७० वर्षीय महिलेची निघृण हत्या करण्यात आली. सुमन किसन शिंदे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. विशेष म्हणजे आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहापासून महिलेचं शीर वेगळं करून दुसऱ्या ठिकाणी ते नेऊन टाकलं. या घटनेनंतर दौंड पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १२ तासांच्या आत २ आरोपींना गजाआड केलं. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

Pune Crime: पुणे हादरले! ७० वर्षांच्या महिलेची हत्या, शीर धडावेगळं करत फेकून दिलं
Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

विकी उर्फ विक्रम अल्हाट आणि प्रसाद चव्हाण अशी संशयित आरोपींची नावं आहेत. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली. हत्या करण्यात आलेली महिला तिच्या घरी एकटीच राहत होती. या प्रकरणातील आरोपींचा आणि महिलेचा वाद झाला होता. हाच राग मनात धरूनच गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी आरोपींनी या महिलेची हत्या केली.

Pune Crime: पुणे हादरले! ७० वर्षांच्या महिलेची हत्या, शीर धडावेगळं करत फेकून दिलं
Thane Crime: गर्लफ्रेंडला घेऊन लॉजवर गेला, भांडणानंतर राग डोक्यात गेला; हत्या करून तरुणाने पळ काढला

महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने तिचं शीर धडापासून वेगळं केलं. पुरावा नष्ट करण्यासाठी ते इतर ठिकाणी नेऊन टाकलं. त्यानंतर महिलेचा मृतदेह कुजू लागला आणि उग्र वास आल्यानंतर याची खबर दौंड पोलिसांना लागली. महिलेचा मृतदेह सापडल्याचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. महिलेच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. या हत्याकांडाच्या घटनेने दौंड हादरले.

Pune Crime: पुणे हादरले! ७० वर्षांच्या महिलेची हत्या, शीर धडावेगळं करत फेकून दिलं
Crime: बँक मॅनेजरची नवऱ्याकडून हत्या, गोळ्या झाडून बहिणीलाही संपवलं; नंतर उचललं टोकाचं पाऊल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com