विकास मिरगणे, साम टीव्ही
नवी मुंबई : मुंबई लोकलमध्ये अपघाताचं सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वी कुर्लामध्ये अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. कुर्ल्यात अपघाताची घटना ताजी असताना हार्बर लाईनवरही अपघाताची घटना घडली होती. वडाळा येथून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलच्या टपावर चढल्याने तरुण कंरट लागून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
हार्बर मार्गावरील वडाला येथून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलच्या टपावर चढल्याने एका तरुणाचा करंट लागून गंभीर झाला. जखमी झालेल्या तरुणाचे नाव अंकुर पांडे असे आहे. तो अंदाजे पंचवीस वर्षांचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, मानखुर्द परिसरात हा तरुण टपावर चढला होता. लोकल वाशी स्थानकात पोहोचल्यावर प्रवाशांच्या आरडाओरडीनंतर पोलिसांना प्रकार समजला. तरुण पूर्णपणे भाजलेला अवस्थेत आढळला. पोलिसांनी तातडीने त्याला वाशीतील मनपा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबईतील जे.जे रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास वाशी रेल्वे पोलीस करत आहेत.
मुंबईमध्ये लोकलमधून पडून काही दिवसांपूर्वी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्य रेल्वेवरील कुर्ला रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. लोकलखाली आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तरुणाचं शीर धडावेगळं झालं. तरुणाच्या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर घटनेमुळे एकच खळबळ उडाली. तरुणाच्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.