बदलापूर–पनवेल मार्गाने प्रवास अवघ्या ३० मिनिटांत शक्य होणार.
३४ किमी लांबीचा बदलापूर–कासगाव–पनवेल रेल्वे मार्ग प्रस्तावित.
नवी मुंबई विमानतळावर पोहोचणे सोपे होणार.
नव्या मार्गामुळे पनवेल–सीएसटी हार्बर मार्गावर गर्दी वाढण्याची शक्यता.
Badlapur Panvel local train connectivity benefits : बदलापुरातून आता थेट पनवेलपर्यंत लोकलने प्रवास करता येणार आहे. नवी मुंबई विमानतळ आणि कल्याण-बदलापूरकरांना रेल्वेचा आणखी एक पर्यायी मार्ग देण्यासाठी रेल्वेकडून खास प्लॅन आखण्यात आला आहे. बदलापूर-पनवेल या मार्गाचे सर्वेक्षण रेल्वेकडून करण्यात येत आहे. बदलापूर-कासगाव-पनवेल हा ३४ किमीचा रेल्वे मार्गावर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे समजतेय. कासगावमध्ये रेल्वे स्थानक उभारणीसाठी रेल्वेकडून हालचालीला सुरू झाल्या आहेत. काही अहवालांनुसार, या रेल्वे मार्गामुळे बदलापूर ते नवी मुंबईचा प्रवास अवघ्या ३० मिनिटांत शक्य होईल. सध्या या प्रवासासाठी रस्ते मार्गे दीड ते दोन तासांचा वेळ लागतो. हा प्रवास लोकलने फक्त ३० मिनिटात शक्य होऊ शकतो. (Travel from Badlapur to Navi Mumbai in 30 minutes)
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर-कासगाव-कामोठे या प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली असून मध्य रेल्वेकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे. हा रेल्वे मार्ग तयार झाल्यास बदलापूर, कल्याण आणि अंबरनाथमधील लोकांना नवी मुंबई विमानतळावर जाणं सोयीस्कर होणार आहे. पण या रेल्वे मार्गामुळे पनवेल-सीएसटी हार्बर मार्गावरील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत भार पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मागील काही वर्षांमध्ये कर्जत, खोपोली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, नेरळ या भागाचा झपाट्याने विकास आणि विस्तार झाला आहे. नवीन गृहप्रकल्प तयार झाले आहेत. कल्याण-शिळ रस्त्यावरील पलावा वसाहतीचे नेरळच्या दिशेने विस्तारीकरण होतेय. लोकांची संख्या वाढल्यामुळे रेल्वेवर अतिरिक्त भार पडत आहे. लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली पण मुंबईकडे जाण्यासाठी कल्याण, ठाणे हा एकमेव रेल्वेमार्ग आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. हीच गर्दी आटोक्यात आणण्यसााठी आणि विभाजन करण्यासाठी बदलापूर- कासगाव- पनवेलपर्यंतच्या ३४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कासगाव येथे रेल्वेस्थानक उभारणीसाठीचे नियोजन करण्यात आलेय. या नव्या रेल्वे मार्गामुळे कर्जत, बदलापूर, अंबरनाथकरांना प्रवासासाठी नवा पर्याय मिळे, पण नवी मुंबईतील स्थानकांवर गर्दी वाढणार आहे.
बदलापूर-कासगाव-पनवेल या प्रस्तावित ३४ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण मध्य रेल्वेने सुरू केले आहे. स्थानकांची यादी आणि मार्गाची अंतिम रचना सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर निश्चित होईल. कासगाव (चामटोली), मोरबे, चौक, तळोजा, कळंबोली,मानसरोवर या प्रमुख स्थानके या मार्गावर अशू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.