महाराष्ट्रातील या ९ पक्षांची मान्यता कायमची रद्द, आयोगाचा मोठा निर्णय | VIDEO

Why did ECI cancel recognition of unrecognized political parties? : भारत निवडणूक आयोगाने देशातील ३३४ अमान्यताप्राप्त पक्षांची नोंदणी रद्द केली. महाराष्ट्रातील ९ पक्षांचा यामध्ये समावेश. पक्षांनी सलग ६ वर्षे निवडणूक न लढवल्यास नोंदणी रद्द होते.

Election Commission of India : भारत निवडणूक आयोगाने (ECI) देशातील तब्बल ३३४ नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी कायमची रद्द केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ९ पक्षाचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली? List of Maharashtra political parties deregistered by ECI

भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील (१) अवामी विकास पार्टी, (२) बहुजन रयत पार्टी, (३) भारतीय संग्राम परिषद, (४) इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, (५) नव भारत डेमोक्रॅटिक पार्टी, (६) नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी, (७) पिपल्स गार्डियन, (८) दि लोक पार्टी ऑफ इंडिया आणि (९) युवा शक्ती संघटना या नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षाची नोंदणी रद्द केली आहे. (ECI DEREGISTERS 9 POLITICAL PARTIES FROM MAHARASHTRA, MAJOR DECISION ANNOUNCED)

देशात सध्या किती पक्ष? -

सध्या देशात ६ राष्ट्रीय पक्ष, ६७ प्रादेशिक पक्ष आणि २८५४ नोंदणीकृत पण मान्यता नसलेले राजकीय पक्ष (RUPPs) आहेत. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम २९अ अंतर्गत नोंदणी करताना पक्षांनी नाव, पत्ता, पदाधिकारी यांची माहिती द्यावी लागते, तसेच सहा वर्षे सलग निवडणूक न लढवल्यास नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आयोगाकडे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com