Maharashtra Politics : मराठीच्या मुद्द्यानंतर आता मनसेचा थेट बीएमसीवर हल्लाबोल; पक्षातील नेत्यांचा थेट 'खळखट्याक'चा इशारा

MNS Politics : मराठीच्या मुद्द्यानंतर आता मनसेने थेट बीएमसीवर हल्लाबोल केला आहे. मालाडमधील स्थानिक प्रश्नांच्या मुद्द्यांवरून नेत्यांनी खळखट्याकचा इशारा दिला आहे.
Raj Thackeray news
Raj thackeray Saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : मुंबईच्या मालाड पी/उत्तर विभागातील मुंबई महानगरपालिका कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज सोमवारी जोरदार मोर्चा काढत पालिकेच्या कारभाराचा निषेध केला. दरवर्षी मैंग्रोव तोडून मालवणी परिसरात उभी राहणारी बेकायदेशीर झोपडे, त्यात होणारे जीवितहानीचे प्रकार आणि प्रशासनाच्या धोरणाविरोधात मनसेने थेट हल्लाबोल केला.

Raj Thackeray news
Dadar Kabutar Khana : 'कबुतरांसाठी गरज पडल्यास शस्त्र हाती घेऊ'; जैन मुनींचा सरकारला इशारा, VIDEO

मनसेने आरोप केला की, 'मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर झोपड्या बांधल्या जात आहेत. त्यात कोण राहतंय,बांगलादेशी नागरिक आहेत का? याची कसलीही तपासणी होत नाही. 'बीएमसीने तात्काळ कारवाई केली नाही तर आम्ही 'मनसे स्टाईल'ने कारवाई करू, असा इशारा विभागाध्यक्ष दिनेश साळवी यांनी दिला.

मनसेच्या आरोपानुसार, दरवर्षी पावसाळ्यात मालवणीतील अशा झोपड्या कोसळून जीवितहानी होते, मात्र बीएमसी फक्त तमाशा पाहत बसते. 'मैंग्रोव तोड, बेकायदेशीर बांधकाम आणि परप्रांतीय अतिक्रमण याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे,' असा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी बीएमसी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली.

Raj Thackeray news
Maharashtra civic polls : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या; काँग्रेस नेत्याची मोठी मागणी, पत्रात काय म्हटलंय?

इशाऱ्यानंतर मालाड आणि मालवणी परिसरातील बेकायदेशीर झोपड्या आणि अतिक्रमणांवर तातडीची कारवाई होईल का, की मनसेला आपला 'स्टाईल' दाखवावा लागेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray news
Stray dogs : भटक्या कुत्र्यांना वाचवाल, तर कठोर कारवाई; सुप्रीम कोर्टाचा कडक इशारा

काय आहे प्रकरण?

मुंबई महानगरपालिका पी/उत्तर विभागाविरुद्ध मनसेने आंदोलन केलं. मनसे कार्यकर्त्यांनी मालाड पी/उत्तर विभाग कार्यालयात मोर्चा काढून पालिकेचा निषेध केला. मैंग्रोव तोडून बेकायदेशीर झोपड्या बांधल्या जात असल्याचा मनसेचा आरोप आहे. यामुळे दरवर्षी बेकायदेशीर झोपड्या कोसळतात. तसेच लोकांचे प्राण जातात, बीएमसी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचाही मनसेचा आरोप आहे. या प्रकरणात पालिकेने कारवाई केली नाही तर आम्ही मनसे स्टाईलने कारवाई करू, असा इशारा मनसेने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com