Mumbai Local Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Infrastructure : कायापलट होणार! बदलापूर, कर्जत ते वसई आणि पनवेल; लोकलच्या १४ प्रोजेक्टसाठी १८३६४ कोटी मंजूर, वाचा

Mumbai Central and Western Railway Project: मुंबईत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या विस्तारासाठी अनेक प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासाठी १८,३६४.९४ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

Siddhi Hande

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत आता रेल्वे सेवेचा विस्तार केला जाणार आहे. रेल्वे मार्गात महत्त्वाचे बदल करण्यसाठी अनेक प्रकल्पांची अंबलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी १८,३६४.९४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

मुंबईची उपनगरी रेल्वे सेवा मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत – खोपोली आणि कसारा, हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बांद्रा, ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल तसेच मध्य रेल्वेवरील पोर्ट मार्गावर नेरूळ/बेलापूर ते उरणपर्यंत पसरलेली आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते डहाणू आणि गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी उपनगरी रेल्वे सेवा कार्यरत आहे.

अलीकडेच प्रवाशांच्या सोयीसाठी नेरूळ/बेलापूर–उरण मार्गावर आणखी १० सेवा वाढविण्यात आल्या असून तसचे तरघर आणि गव्हाण ही दोन अतिरिक्त स्थानकेही कार्यान्वित करण्यात आली आहेत.यानंतर मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेवर अनेक प्रकल्प सुरु केले जाणार आहेत. या प्रकल्पांची सविस्तर माहिती जाणून घ्या.

मध्य रेल्वेवरील प्रकल्प

१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला ५वा व ६वा मार्ग प्रकल्प

प्रकल्पाचा तपशील:

MUTP–II अंतर्गत मध्य रेल्वेमार्फत राबविण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–कुर्ला ५वा व ६वा मार्ग प्रकल्प, एकूण १७.५ ट्रॅक किलोमीटर लांबीचा असून अंदाजे रु ८९१ कोटी खर्चाचा आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये अंमलात आणला जात आहे.

टप्पा–I:

परळ ते कुर्ला दरम्यान १०.१ कि.मी. लांबीचा असून डिसेंबर–२०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

टप्पा–II:

परळ ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान ७.४ कि.मी. लांबीचा आहे.

लाभ:

• अधिक उपनगरी व लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा चालविण्यासाठी मार्गक्षमता वाढेल.

• विद्यमान मार्गांवरील गर्दी व विलंब कमी होईल.

• रेल्वे सेवांची एकूण वेळपालनता सुधारेल.

२. पनवेल – कर्जत उपनगरीय कॉरिडॉर प्रकल्प

प्रकल्पाचा तपशील:

MUTP–III अंतर्गत पनवेल– कर्जत उपनगरीय कॉरिडॉर प्रकल्प एकूण २९.६ ट्रॅक किलोमीटर लांबीचा असून अंदाजे रु २,७८२ कोटी खर्चाचा आहे. हा प्रकल्प एमआरव्हीसीमार्फत राबविण्यात येत आहे.

सध्या माती भरावाचे काम तसेच बोगदे व पुलांच्या बांधकामाचे काम प्रगतीपथावर असून डिसेंबर–२०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

लाभ:

• पनवेल व कर्जत दरम्यान प्रवाशांसाठी नवीन उपनगरीय जोडणी उपलब्ध होऊन प्रवासाचा वेळ कमी होईल.

• कर्जतला जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.

• या मार्गावर उपनगरी रेल्वे सेवेची वारंवारता वाढू शकेल.

३. कल्याण – आसनगाव ४था मार्ग प्रकल्प

प्रकल्पाचा तपशील:

MUTP–III-A अंतर्गत मध्य रेल्वेमार्फत राबविण्यात येणारा कल्याण – आसनगाव ४था मार्ग प्रकल्प एकूण ३२ ट्रॅक किलोमीटर लांबीचा असून अंदाजे रु१,७५९ कोटी खर्चाचा आहे. हा प्रकल्प सध्या अंमलबजावणीच्या टप्प्यात आहे.

भूमी संपादनाचे काम प्रगतीपथावर असून डिसेंबर – २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

लाभ:

• अधिक उपनगरी रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी मार्गक्षमता वाढून गाड्यांमधील गर्दी कमी होण्यास मदत होईल.

• उच्च घनतेच्या या मार्गावर विलंब कमी होऊन कार्यक्षमतेत सुधारणा होईल.

• प्रवासी तसेच मालवाहतूक सेवांसाठी भविष्यातील वाढत्या मागणीस पाठबळ मिळेल.

४. कल्याण – बदलापूर ३रा व ४था मार्ग प्रकल्प

प्रकल्पाचा तपशील:

MUTP–III-A अंतर्गत कल्याण – बदलापूर ३रा व ४था मार्ग प्रकल्प एकूण १४.०५ ट्रॅक किलोमीटर लांबीचा असून अंदाजे रु १,५१० कोटी खर्चाचा आहे. हा प्रकल्प एमआरव्हीसीमार्फत राबविण्यात येत आहे.

सध्या उपयुक्त सेवांचे स्थलांतर, माती भराव तसेच पुलांच्या बांधकामाचे काम प्रगतीपथावर असून डिसेंबर–२०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

लाभ:

• उपनगरी सेवांसाठी मार्गक्षमता वाढून गाड्यांमधील गर्दी कमी होईल.

• प्रणालीची एकूण वेळपालनता सुधारेल.

• उपनगरी सेवांची विश्वासार्हता व वारंवारता वाढेल.

५. कल्याण – कसारा ३रा मार्ग प्रकल्प

प्रकल्पाचा तपशील:

मध्य रेल्वेमार्फत राबविण्यात येणारा कल्याण – कसारा ३रा मार्ग प्रकल्प एकूण ६७ ट्रॅक किलोमीटर लांबीचा असून अंदाजे रु ७९२ कोटी खर्चाचा आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये अंमलात आणला जात आहे.

टप्पा–I:

आसनगाव ते कसारा

टप्पा–II:

कल्याण ते आसनगाव

दोन्ही टप्प्यांसाठी डिसेंबर–२०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

लाभ:

• विशेषतः गर्दीच्या वेळेत गाड्यांच्या संचालनात अधिक लवचिकता मिळेल.

• या मार्गावरील अडथळे व विलंब होण्याची शक्यता कमी होईल.

• मुंबईच्या उत्तर उपनगरांकडे ये–जा करणाऱ्या प्रवाशांसाठी जोडणी अधिक सुलभ होईल.

६. ऐरोली – कळवा (उन्नत) उपनगरीय कॉरिडॉर लिंक प्रकल्प

प्रकल्पाचा तपशील:

MUTP–III अंतर्गत ऐरोली – कळवा (उन्नत) उपनगरीय कॉरिडॉर लिंक प्रकल्प एकूण ३.३ ट्रॅक किलोमीटर लांबीचा असून अंदाजे रु४७६ कोटी खर्चाचा आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये अंमलात आणला जात आहे.

टप्पा–I अंतर्गत दिघा गाव स्थानक कार्यान्वित करण्यात आले आहे.

टप्पा–II – स्थिती: भूमी संपादन व पुनर्वसन (R&R) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३० महिन्यांत काम पूर्ण केले जाणार आहे.

हा प्रकल्प एमआरव्हीसीमार्फत राबविण्यात येत आहे.

लाभ:

• उपनगरी रेल्वे सेवांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन विद्यमान मार्गांवरील गर्दी कमी झाली आहे.

• ठाणे व नवी मुंबईदरम्यानची जोडणी सुधारून इतर मार्गांवरील ताण कमी झाला आहे.

• प्रवासाचा वेळ कमी होऊन प्रवाशांसाठी प्रवेशयोग्यता सुधारली आहे.

७. निळजे–कोपर डबल कॉर्ड लाइन प्रकल्प

प्रकल्पाचा तपशील:

मध्य रेल्वेमार्फत राबविण्यात येणारा निळजे– कोपर डबल कॉर्ड लाइन प्रकल्प एकूण ५ ट्रॅक किलोमीटर लांबीचा असून अंदाजे रु ३३८ कोटी खर्चाचा आहे. या प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

लाभ:

• प्रवासी तसेच मालवाहतूक गाड्यांसाठी मार्गक्षमता वाढेल.

• या कॉरिडॉरवरील गर्दी कमी होऊन गाड्यांची वारंवारता सुधारेल.

• रेल्वे सेवांची विश्वासार्हता व वेळपालनता वाढेल.

८. बदलापूर – कर्जत ३रा व ४था मार्ग प्रकल्प

प्रकल्पाचा तपशील:

मध्य रेल्वेमार्फत राबविण्यात येणारा बदलापूर – कर्जत ३रा व ४था मार्ग प्रकल्प एकूण ६४ (३२ x २) कि.मी. मार्ग लांबीचा असून यामध्ये ८ प्रमुख पूल, १०६ लहान पूल, १ रोड अंडर ब्रिज तसेच मार्गावर ६ स्थानकांचा समावेश आहे.

या प्रकल्पाचा एकूण खर्च रु१,३२४ कोटी असून रेल्वे व महाराष्ट्र शासन यांच्यात ५०:५० खर्च वाटपाच्या तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

लाभ:

• मुंबई उपनगरी रेल्वे जाळ्यासाठी हा एक महत्त्वाचा दुवा असून कल्याण–कर्जत मार्गावरील वाहतूक ताण कमी होण्यास मदत होईल.

• मुंबई उपनगरी नेटवर्कवरील दैनंदिन प्रवाशांना याचा मोठा लाभ होईल.

• मुंबई व पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुविधा मिळेल.

• अधिक प्रवासी व मालवाहतूक गाड्या सुरू करणे शक्य होईल.

• औद्योगिक विस्तारामुळे निर्माण झालेल्या क्षमतेच्या मर्यादा दूर करण्यास मदत होईल.

• दरवर्षी सुमारे ७.२ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

• दरवर्षी सुमारे ४१ लाख लिटर डिझेलची बचत होऊन सुमारे रु४६.२ कोटी इतका लॉजिस्टिक खर्च वाचण्याची शक्यता आहे.

• दरवर्षी सुमारे २ कोटी किलो कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट होऊन, सुमारे ८ लाख झाडे लावण्याइतका पर्यावरणीय लाभ होईल.

९. आसनगाव – कसारा ४था मार्ग प्रकल्प

प्रकल्पाचा तपशील:

मध्य रेल्वेमार्फत राबविण्यात येणारा आसनगाव– कसारा ४था मार्ग प्रकल्प एकूण ३५ ट्रॅक किलोमीटर लांबीचा असून अंदाजे रु७३७.८५ कोटी खर्चाचा आहे. हा प्रकल्प सध्या प्रक्रियाधीन आहे.

लाभ:

• मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कवरील दैनंदिन प्रवाशांना लाभ होईल.

• गाड्यांच्या संचालनात अधिक लवचिकता मिळेल.

• या मार्गावरील अडथळे व विलंब होण्याची शक्यता कमी होईल.

• मुंबईच्या उत्तर उपनगरांकडे ये–जा करणाऱ्या प्रवाशांसाठी जोडणी अधिक सुलभ होईल.

पश्चिम रेल्वेवरील प्रकल्प

१. मुंबई सेंट्रल–बोरिवली ६था मार्ग प्रकल्प

प्रकल्पाचा तपशील:

MUTP–II अंतर्गत मुंबई सेंट्रल–बोरिवली ६था मार्ग प्रकल्प एकूण ३० ट्रॅक किलोमीटर लांबीचा असून अंदाजे ₹९१९ कोटी खर्चाचा आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये अंमलात आणला जात आहे.

• टप्पा–I: खार–कांदीवली स्थानक कार्यान्वित झाले आहेत.

• टप्पा–II: कांदीवली–बोरिवली ३.२१ कि.मी. मार्गावर काम प्रगतीपथावर असून जानेवारी–२०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

लाभ:

• मुंबई उपनगरी विभागाच्या मार्गक्षमतेत वाढ.

• गजबजलेल्या उपनगरी व मुख्य मार्गांवरील गर्दी कमी होईल.

• गाड्यांच्या वेळपालनतेत सुधारणा.

• बांद्रा टर्मिनसकडून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांसाठी या मार्गावर दोन समर्पित मार्ग उपलब्ध.

• मुख्य मार्ग व उपनगरी मार्गातील गाड्यांचे विभाजन.

• अंधेरी–बोरिवली–विरार विभागातील प्रवाशांसाठी सुविधा.

२. गोरेगाव – बोरिवली हार्बर मार्गीका विस्तार प्रकल्प

प्रकल्पाचा तपशील:

MUTP–III-A अंतर्गत गोरेगाव–बोरिवली हार्बर लाइन विस्तार प्रकल्प एकूण ७.०८ ट्रॅक किलोमीटर लांबीचा असून अंदाजे रु ८९८ कोटी खर्चाचा आहे.

सध्या या प्रकल्पासाठी भूमी संपादनाचे काम प्रगतीपथावर आहे.

• गोरेगाव – मालाड विभाग: मार्च–२०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

• मालाड–बोरिवली विभाग: डिसेंबर–२०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

लाभ:

• बोरिवली व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान थेट रेल्वे सेवा (जोडणी) उपलब्ध.

• गोरेगाव – बोरिवली विभागावर मार्गक्षमता वाढेल.

• गोरेगाव व बोरिवली स्थानकांवरील गर्दी कमी होईल.

• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाण्यासाठी गोरेगाव येथे गाड्या बदलण्याची आवश्यकता नाही.

• पश्चिम उपनगरांतील प्रवाशांसाठी लाभदायक.

३. बोरिवली– विरार ५वा व ६वा मार्ग प्रकल्प

प्रकल्पाचा तपशील:

MUTP–III-A अंतर्गत बोरिवली–विरार ५वा व ६वा मार्ग प्रकल्प एकूण २६ ट्रॅक किलोमीटर लांबीचा असून अंदाजे रु २,१८४.०९ कोटी खर्चाचा आहे.

ररेल्वे लाइन निश्चित झालेली असून उपयुक्त सेवांचे स्थलांतर तसेच पूल/प्लॅटफॉर्म काम प्रगतीपथावर आहे.

• पूर्ण करण्याचे उद्दिष्ट: मार्च–२०२८

• हा प्रकल्प एमआरव्हीसी मार्फत राबविण्यात येत आहे.

लाभ:

• बोरिवली – विरार विभागात अतिरिक्त मार्गक्षमता उपलब्ध.

• अधिक स्थानिक गाड्या चालविण्यात मदत.

• विरार व बोरिवली दरम्यान प्रवाशांसाठी प्रवास अधिक सुलभ.

• मुख्य मार्ग व उपनगरी मार्गातील गाड्यांचे विभाजन.

४. विरार– डहाणू ३रा व ४था मार्ग प्रकल्प

प्रकल्पाचा तपशील:

MUTP–III अंतर्गत विरार–डहाणू ३रा व ४था मार्ग प्रकल्प एकूण ६४ ट्रॅक किलोमीटर लांबीचा असून अंदाजे रु ३,५७८ कोटी खर्चाचा आहे.

हा प्रकल्प एमआरव्हीसी मार्फत राबविण्यात येत आहे.

• कामाची स्थिती: ४३% भौतिक प्रगती, ५० पूल/आर.यू.बी. पूर्ण

• पूर्ण करण्याचे उद्दिष्ट: डिसेंबर–२०२६

लाभ:

• विरार– डहाणू विभागात अतिरिक्त मार्गक्षमता उपलब्ध.

• या विभागात अधिक उपनगरी गाड्या चालविण्यात मदत.

• वैतरणा ते डहाणू रोड प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास सुलभ.

• पालघर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी, विशेषतः विरारच्या पलीकडे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लाभदायक.

५. नायगांव–जुचंद्र डबल कॉर्ड लाइन प्रकल्प

प्रकल्पाचा तपशील:

पश्चिम रेल्वेमार्फत राबविण्यात येणारा नायगांव –जुचंद्र डबल कॉर्ड लाइन प्रकल्प एकूण ६ ट्रॅक किलोमीटर लांबीचा असून अंदाजे रु.१७६ कोटी खर्चाचा आहे.

• सध्या कामाची स्थिती: प्रगतीपथावर

• पूर्ण करण्याचे उद्दिष्ट: मार्च–२०२८

लाभ:

• मुंबई सेंट्रल/बांद्रा टर्मिनसकडून कोकण रेल्वे, पनवेल आणि पुढील मार्गासाठी थेट जोडणी उपलब्ध, वसई रोडवर लोको उलट फिरवण्याची आवश्यकता नाही.

• पश्चिम उपनगरातील लोकांसाठी कोकण, गोवा आणि पुढे प्रवास करताना सुविधा.

• नवीन गाड्या सुरू करण्यास मदत.

• वसई रोड स्थानकावर लोको उलट फिरवण्याची आवश्यकता नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोनाल्ड ट्रम्प आणि एप्स्टिनवर बलात्काराचा आरोप, गोळी लागून महिलेचा मृत्यू

थर्टी फर्स्टसाठी फिरायला जाण्याचा प्लान करताय? लोणावळ्यातील महत्त्वाचे पॉईंट्स राहणार बंद; कारण काय?

Thane : ७ दिवसांचं बाळ ६ लाखांत विकत होते, पोलिसांनी फिल्डिंग लावून उधळला डाव; बदलापुरातील धक्कादायक घटना

Akola Muncipal Elections : अकोल्यात महायुतीच्या जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला ठरला, कोणाच्या वाट्याला किती जागा? वाचा

भाजपनं केरळमध्ये रचला इतिहास, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर विराजमान; विधानसभा निवडणुकीआधीच मोठे संकेत

SCROLL FOR NEXT