Railway Fare Hike: मुंबई-पुणे प्रवास महागणार का? आजपासून रेल्वेचे नवीन तिकीट दर लागू, वाचा किती झाली वाढ

Railway Ticket Fare Hike: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेच्या तिकीट दरात आजपासून वाढ झाली आहे. लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या तिकीटात वाढ झाली आहे.
Railway Fare Hike
Railway Fare HikeSaam Tv
Published On
Summary

आजपासून रेल्वे प्रवास महागणार

लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या तिकीटात वाढ

मुंबई-पुणे प्रवास महागणार का?

रेल्वे मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने आता तिकीट दरात वाढ केली आहे.यामुळे प्रवाशांच्या खिशाला फटका बसणार आहे. रेल्वेने लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या तिकीटात वाढ केली आहे. त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्यांचे महिन्याभराचे बजेट कोलमडणार असल्याचे दिसत आहे.

Railway Fare Hike
Railway News : 103 वर्षांचा पूल पाडणार, रविवारी ११ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, इंटरसिटीसह या ट्रेन्सवर होणार परिणाम

या रेल्वेचं तिकीट महागणार (Railway Ticket Fare Hike From Today)

लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या तिकीटात वाढ होणार आहे. २१५ किमीपेक्षा जास्त प्रवासाच्या ट्रेनच्या तिकीटांमध्ये बदल केले जाणार आहेत. २१५ किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी प्रति किलोमीटरमागे १ पैशांची वाढ झाली आहे.

२१५ ते ७५० किलोमीटपर्यंत प्रवासासाठी आता तुम्हाला जास्तीचे ५ रुपये द्यावे लागणार आहे. ७५० किमी ते १२५० किमीपर्यंत प्रवास करण्यासाठी जास्तीचे १० रुपये द्यावे लागणार आहे. १२५१ ते १७५० किमी प्रवासाच्या तिकीटात १५ रुपयांची वाढ झाली आहे. १७५० ते २२५० पर्यंत प्रवासासाठी तिकीट दरात २० रुपयांनी वाढ केली आहे.

स्लीपर कोचसाठी २१५ पेक्षा जास्त किलोमीटरच्या अंतरासाठी प्रति किमीमागे १ पैशांनी वाढ केली आहे. मेल किंवा एक्सप्रेस ट्रेनमध्ये नॉन एसी आणि एसी या दोन श्रेणींसाठी २ पैसे प्रति किलोमीटरमागे वाढ झाली आहे. यामध्ये स्लीपर, फर्स्ट क्लास, एसी चेअर कार, एसी थ्री टियर, एसी टू टियर आणि एसी फर्स्ट क्लासचा समावेश आहे. या ट्रेनच्या तिकीटात वाढ झाली आहे.

Railway Fare Hike
Railway Ticket : रेल्वे प्रवासावेळी मोबाइलमधील तिकीट चालेल की नाही? रेल्वेने एका झटक्यात स्पष्ट केले, वाचा सविस्तर

मुंबई पुणे प्रवास महागणार का? (Mumbai Pune Railway Ticket Price)

मुंबई पुणे प्रवास महागणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. मुंबई पुणे रेल्वे प्रवास महागणार नाहीये. हे अंतर १५५ किमी आहे. त्यामुळे या अंतरासाठी कोणत्याही तिकीट दरात वाढ करण्यात आलेली नाही. २१५ किमीपेक्षा जास्त अंतरासाठी प्रवासाचे तिकीट दर वाढणार आहेत.

Railway Fare Hike
Western Railway : पश्चिम रेल्वेवर 'या' दिवशी ३०० लोकल रद्द! नेमकं कारण काय? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com