Railway News : 103 वर्षांचा पूल पाडणार, रविवारी ११ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, इंटरसिटीसह या ट्रेन्सवर होणार परिणाम

Solapur British Made Mirai Road Over Bridge Demolished : सोलापूरमधील १०३ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन रोड ओव्हर ब्रिजच्या पाडकामाच्या कामासाठी १४ डिसेंबर रोजी ११ तासांचा मेगा ट्रॅफिक ब्लॉक जाहीर. इंद्रायणी एक्सप्रेससह ९ गाड्या रद्द तर ९ गाड्यांचे मार्ग बदलले. सोलापूर शहरात वाहतूक बदलामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता.
Railway News : 103 वर्षांचा पूल पाडणार, रविवारी ११ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, इंटरसिटीसह या ट्रेन्सवर होणार परिणाम
Solapur Railway NewsSaam Tv
Published On
Summary
  • सोलापूरचा ब्रिटिशकालीन पूल १४ डिसेंबर रोजी पाडण्याची प्रक्रिया सुरू

  • ११ तासांच्या मेगा ब्लॉकमुळे ९ गाड्या रद्द आणि ९ गाड्या मार्गांतरित

  • इंटरसिटी (इंद्रायणी एक्सप्रेस) फक्त कुर्डूवाडीपर्यंत धावणार

  • सोलापूर शहरात वाहतूक बदल लागू

सोलापूर मधील १९२२ साली ब्रिटिशकाळात बांधलेला रोड ओव्हर ब्रिज अखेर येत्या रविवारी म्हणजेच १४ डिसेंबर २०२५ रोजी पाडण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज हा जुना पूल पाडण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात येत आहे. यामुळे काल मध्यरात्रीपासून मरीआई चौक ते भय्या चौक हा मार्ग वर्षभरासाठी बंद असणार आहे.

मरीआई चौक-शेटे नगर-एसटी स्टैंड,मरीआई चौक-नागोबा मंदिर स्टेशन आणि जगताप हॉस्पिटल नवीन रेल्वे बोगदा-जुना पुणे नाका या तीन पर्यायी अधिकाऱ्यांसह वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. या काळात पोलिस सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत ऑन ड्युटी असणार आहेत. पुलावरील वाहतूक थांबवल्याने शहरातील वाहतूकीवर जास्त परिणाम होऊ नये यासाठी शहर वाहतूक शाखेकडून १२ ठिकाणी फिक्स पॉईंट ठेवण्यात आले आहेत. यामुळे वाहतूक शाखेवर ताण वाढल्याने अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी वाहतूक विभागाकडून करण्यात आली आहे.

Railway News : 103 वर्षांचा पूल पाडणार, रविवारी ११ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, इंटरसिटीसह या ट्रेन्सवर होणार परिणाम
Weather Update : पुढील ४८ तास महत्त्वाचे! ऐन हिवाळ्यात मुसळधार पाऊस कोसळणार, कोणत्या राज्यांना बसणार फटका?

दरम्यान या कामासाठी रेल्वेकडून सकाळी ८:३० ते रात्री ७:३० असा तब्बल ११ तासांचा मेगा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान सोलापूर यार्डातील सर्व ये-जा मेन लाईन आणि लुपलाईनवर वाहतूक बंद राहणार आहे. या ब्लॉकचा परिणाम म्हणून अनेक गाड्या रद्दकरण्यात आल्या असून काही वळवल्या आहेत. तर काही शॉर्ट-टर्मिनेट तसेच उशिराने चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

Railway News : 103 वर्षांचा पूल पाडणार, रविवारी ११ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, इंटरसिटीसह या ट्रेन्सवर होणार परिणाम
Alibag Leopard : अलिबागमध्ये बिबट्याची दहशत! ५ जणांवर दिवसाढवळ्या हल्ला, शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

सोलापूरकरांसाठी महत्त्वाची असणारी सोलापूर - पुणे - पुणे सोलापूर दरम्यान धावणारी 'इंटरसिटी' अर्थात 'इंद्रायणी एक्सप्रेस' रविवार १४ डिसेंबर रोजी कुर्डूवाडी पर्यंतच येणार असून तेथूनच पुढे पुण्याला रवाना होणार आहे. यामुळे सोलापूरकर प्रवाशांची तारांबळ उडणार आहे. बागलकोट–म्हैसूर एक्सप्रेस १४ डिसेंबर रोजी रात्री १२.३० वाजता बागलकोटहून सुटेल.

Railway News : 103 वर्षांचा पूल पाडणार, रविवारी ११ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, इंटरसिटीसह या ट्रेन्सवर होणार परिणाम
Maval : कोट्यवधींचे तलाठी कार्यालय धुळ खातंय! खासगी ठिकाणीच महसूल कामकाज सुरू असल्याचा आरोप

१४ डिसेंबर रोजी 'या' गाड्यांवर होणार परिणाम

  • होस्पेट – सोलापूर डेमू

  • सोलापूर – पुणे डेमू

  • सोलापूर – होस्पेट डेमू

  • वाडी – सोलापूर डेमू

  • सोलापूर – दौंड डेमू विशेष

  • हडपसर – सोलापूर डेमू

  • दौंड – कलबुर्गी विशेष

  • सोलापूर – कलबुर्गी विशेष

  • कलबुर्गी – दौंड विशेष

या ९ गाड्या १४ डिसेंबर रोजी रद्द करण्यात येणार आहेत.

Railway News : 103 वर्षांचा पूल पाडणार, रविवारी ११ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, इंटरसिटीसह या ट्रेन्सवर होणार परिणाम
Today Weather News : महाराष्ट्रात हुडहुडी! तापमान १० अंशाखाली घसरलं, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी; वाचा IMDचा अंदाज

मार्ग बदललेल्या ९ गाड्या

  • म्हैसूर–पंढरपूर गोलगुंबझ ही गाडी १३ डिसेंबर रोजी गदग–हुबळी–मिरज–पंढरपूरमार्गे धावेल

  • पंढरपूर–म्हैसूर गोलगुंबझ ही गाडी १४ डिसेंबर रोजी मिरज–लोनढा–गदगमार्गे धावेल

  • विजापूर–रायचूर—विजापूर पॅसेंजर ही गाडी होटगी–वाडी–सोलापूर बायपास मार्गे धावेल.

  • तिरुअनंतपुरम–मुंबई एक्सप्रेस ही गाडी गुंटकल–होस्पेट–हुबळी–मिरज–पुणेमार्गे धावेल.

  • बंगळुरू–मुंबई उद्यान ही गाडी १३ डिसेंबर रोजी हुबळी–मिरज–पुणेमार्गे धावेल.

  • मुंबई–बंगळुरू उद्यान ही गाडी १४ डिसेंबर रोजी पुणे–मिरज–गुंटकलमार्गे धावेल.

  • एलटीटी–विशाखापट्टणम ही गाडी १४ डिसेंबर रोजी कुर्डूवाडी–लातूर–विकाराबादमार्गे धावेल.

  • पुणे–सिकंदराबाद शताब्दी ही गाडी कुर्डूवाडी–लातूर–विकाराबादमार्गे धावेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com