नवीन वर्षासाठी रेल्वेची ३ स्पेशल गाड्यांची घोषणा
मुंबईहून गोवा, केरळ आणि मंगळुरूला प्रवास सुलभ
प्रवाशांच्या गर्दीला कमी करण्यासाठी विशेष उपाय
तिकीट बुकिंग ८ डिसेंबरपासून सुरू
इंग्रजी वर्षातील शेवटचा महिना काही दिवसांतच संपणार असून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. या नव्या वर्षाच्या आगमनाला अनेकांचे वेगवेगळे प्लॅन ठरतात. ( New Year Special Train ) अनेक जण बाहेरगावी नवनवीन ठिकाणी फिरायला जातात. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवाशांसाठी ३ अतिरिक्त गाड्या सोडल्या आहेत. या गाड्या मुंबई आणि गोवा (करमाळी) आणि मुंबई आणि दक्षिण भारत (तिरुवनंतपुरम आणि मंगळुरू) दरम्यान धावणार आहेत.
ही ट्रेन गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी दिलासा देणारी आहे, कारण ही गाडी नियमितपणे धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते करमाळी - सीएसएमटीहून दररोज ००:२० वाजता सुटते आणि त्याच दिवशी दुपारी १:३० वाजता करमाळीला पोहोचते. ही ट्रेन १९ डिसेंबर २०२५ ते ५ जानेवारी २०२६ पर्यंत नियोजित वेळेनुसार धावेल. तसेच करमाळी ते सीएसएमटी ही ट्रेन दररोज करमाळीहून दुपारी २:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ३:४५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. ही ट्रेन १९ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२६ पर्यंत धावेल. यादरम्यान ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांवर थांबेल. या ट्रेनचे तिकीट बुकिंग ८ डिसेंबर रोजी सुरू होईल.
ही विशेष ट्रेन मुंबई एलटीटी ते तिरुवनंतपुरम दर गुरुवारी सायंकाळी ४ वाजता एलटीटीहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११:३० वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल. ही विशेष ट्रेन १८, २५ डिसेंबर आणि १ जानेवारी २०२६ रोजी धावेल. तिरुवनंतपुरम ते एलटीटी ही ट्रेन दर शनिवारी दुपारी ४:२० वाजता तिरुवनंतपुरमहून निघेल. मध्यरात्रीनंतर तिसऱ्या दिवशी पहाटे १:०० वाजता एलटीटीला पोहोचेल. ही ट्रेन २०, २७ डिसेंबर आणि ३ जानेवारी, २०२६ रोजी धावेल. तसेच ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मोरगाव रोड, मोरगाव रोड येथे थांबेल. उडुपी, सुरथकल, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरनूर जंक्शन, त्रिशूर, अलुवा, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, चांगनासेरी, थिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायमकुलम, करुणागप्पल्ली, सस्थानम जंक्शन, सस्थानकोटा स्टेशन आणि कोट्टाम या स्थानकांवर थांबेल.
एलटीटी ते मंगळुरू जंक्शन ही गाडी दर मंगळवारी सायंकाळी ४ वाजता एलटीटी, मुंबई येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०:०५ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. ही गाडी १६, २३, ३० डिसेंबर आणि ६ जानेवारी २०२६ रोजी धावेल. परतीच्या दिशेने, ०११८६ मंगळुरू जंक्शन ते एलटीटी ही ट्रेन दर बुधवारी दुपारी १:०० वाजता मंगळुरू जंक्शनवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ही ट्रेन १७, २४, ३१ डिसेंबर आणि ७ जानेवारी २०२६ रोजी धावेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मोरगाव रोड, मोरगाव रोड, पनवेल येथे थांबेल. उडुपी आणि सुरथकल स्टेशन इथे थांबेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.