Today Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट! 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा येलो अलर्ट; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Weather Update : उत्तरेकडील शीत लहरींचे पुन्हा महाराष्ट्रात आगमन झाल्याने राज्यात गारठा वाढला आहे. पुढील काही दिवसात थंडीचा कडाका वाढणार असून काही जिल्ह्यांना सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यंदाच्या हंगामातील यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Today Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट! 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा येलो अलर्ट; जाणून घ्या सविस्तर
Maharashtra Weather UpdateSaam Tv
Published On
Summary
  • उत्तरेकडील शीत लहरींचे पुन्हा महाराष्ट्रात आगमन

  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी

  • नागपूर, यवतमाळ, मालेगाव, नाशिक, धुळे भागात थंडी वाढली

  • यंदाच्या हंगामातील यवतमाळ जिल्ह्याचा सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

उत्तरेकडील शीत लहरींचे पुन्हा महाराष्ट्रात आगमन झाल्याने राज्यात गारठा वाढला आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात पारा ५.४ अंशांवर आल्याने हंगामातील नीचांकी तापमान नोंदले गेले आहे. आज विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटेची शक्यता आहे. तर उद्यापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान बदलत्या हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

महाराष्ट्रात हळूहळू पुन्हा गारठा वाढू लागला आहे. नागरिकांनी थंडी पासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवलेल्या पाहायला मिळत आहेत. विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान घटल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. पहाटे धुक्याची चादर पसरत असून, हुडहुडी वाढत आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे यंदाच्या हंगामातील नीचांकी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Today Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट! 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा येलो अलर्ट; जाणून घ्या सविस्तर
Pune : खोटे शिक्के घेतले, कागदपत्रे तयार केली; पुणे महापालिका आणि बँकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदाराला बेड्या

नाशिकच्या ग्रामीण भागात तापमानाचा पारा घसरला आहे. तसेच मालेगावचे तापमान अकरा अंशावर असताना पारा आणखी खाली घसरला असून तो ९ अंशावर आल्याने नागरीकांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. शिवाय यंदाच्या हंगामातील यवतमाळ जिल्ह्याचा सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली असून पारा ८.८ अंशावर स्थिरावला. तर दुसरीकडे दिवसाचे तापमान वाढत असल्याचेही विरोधाभासी चित्र निर्माण झाली आहे. जळगाव, अहिल्यानगर, अमरावती, ‎नागपूर, मालेगाव, ‎छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा देखील तापमानाचा पारा घसरला असून हुडहुडी वाढली आहे.

Today Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट! 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा येलो अलर्ट; जाणून घ्या सविस्तर
Ravindra Chavan : महायुतीत फोडाफोडीला ब्रेक? शिवसेना पदाधिकाऱ्याचा भाजप प्रवेश तूर्तास स्थगित

किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट आल्याचे समजले जाते. रविवारी धुळे, निफाड, परभणी, अमरावती, यवतमाळ येथे थंडीची लाट होती. आज राज्यातील पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर आणि गोंदिया येथे थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जाहीर केला आहे. उद्यापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान या बदलत्या हवामानाने नागरिक त्रस्तावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com