Breaking News

Mumbai Local : हार्बर लोकल ठप्प, नेरूळ स्थानकावर तांत्रिक बिघाड, अप-डाऊन मार्गावर ट्रेनच्या रांगा

Harbour Line Train Delay: बेलापूर-सीवूड्स दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर गाड्या अडकल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
Massive disruption on Mumbai’s Harbour Line
Massive disruption on Mumbai’s Harbour LineSaam TV News Marathi
Published On: 

Harbour Line Disrupted Again : मुंब्रा येथील लोकल अपघातामुळे संतापाची लाट असतानाच हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लोकलची सेवा कोलमडली आहे. बेलापूर-सीवूड्स स्थानकावर दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. मागली २० ते २५ मिनिटांपासून लोकलसेवा कोलमडली आहे. पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल बेलापूर-खारघार स्थानकादरम्यान थांबल्या आहेत. तर सीएसएमटीकडून येणाऱ्या लोकल सीवूड्स स्थानकाच्या आधी थांब्या गेल्या आहेत. प्रवाशांनी नेरूळ स्थानाकवरही लोकल थांबल्याची माहिती दिली आहे.

मुंबईच्या हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी सकाळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी ते पनवेल दरम्यानच्या अप आणि डाउन लोकल सेवा ठप्प झाल्या असून, नेरुळ स्थानकात गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. बेलापूर ते सीवूड्सदरम्यान अनेक गाड्या अडकल्याने प्रवाशांचा प्रचंड खोळंबा झाला आहे. रेल्वे प्रशासनाने तांत्रिक बिघाडाचं कारण सांगितलं असलं, तरी दुरुस्ती कधी पूर्ण होईल याबाबत स्पष्टता नाही. हजारो प्रवाशांचं दैनंदिन वेळापत्रक कोलमडलं असून, रेल्वे स्थानकांवर तणावाचं वातावरण आहे. प्रशासन लवकरात लवकर सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं जात आहे.

ठाणे- नेरुळदरम्यानची रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे बराच वेळ ट्रेन एकाच ठिकाणी उभी आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. नेरुळच्या जवळ हा बिघाड झाल्याने ठाणे-वाशी रेल्वे सेवा सुरु आहे.

मध्य रेल्वेच्या लोकल संथ गतीने -

मुंब्रा स्थानाकात घडलेल्या दुर्घटनेनंतर रेल्वेकडून रूळाची पडताळणी करण्यात येत आहे.मुंब्रा स्थानकाजवळ लोकल संथ गतीने धावत असल्याचे दिसतेय. मध्य रेल्वेवर आज लोकल उशिराने धावत आहे. सकाळी कामावर जाण्यासाठी घरातून निघालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल उशिराने असल्याने त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com