mumbai saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : निदर्यी नातवानं कॅन्सरग्रस्त आजीला कचऱ्याच्या ढिगात फेकलं, मुंबईतील माणुसकीला काळिमा

Mumbai News : आता एक मन सुन्न करून टाकणारी घटना..साठीच्या आजारी आजीला नातवानं कचऱ्यात टाकलंय.. मात्र ही घटना कशी उघड झाली? आणि नातवाने हे कृत्य का केलं? पाहूयात....

Vaishnavi Raut

रस्त्याच्या कडेला असलेला कऱ्याचा ढिगारा...आणि या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात निपचित पडलेल्या आजी..वय वर्षे 60.... आजारामुळे चालणं बोलणं ही अशक्य.. .आपण इथे कसे आलो याचं भानही त्यांना नाही...त्यांना मुळी काही आठवतचं नाही...याचाच फायदा घेत नातवानं आजीला थेट कचऱ्यातच फेकून दिलंय...खाऊनपिऊन झाल्यावर एखादा कागदाचा बोळा जितक्या सहजपणे फेकून द्यावा तितक्या सहजपणे......... नेमकं काय घडलं? पाहूयात....

- पोलीस नियंत्रण कक्षाला फोन

- आरे कॉलनीतील जंगलात पोलिस दाखल

- कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 60 वर्षीय महिला

- महिलेच्या शरीरावर प्रचंड जखमा

60 वर्षाच्या यशोदा गायकवाड या कॅन्सरग्रस्त आहेत.. त्वचेच्या कॅन्सरमुळे बेहालेत. कॅन्सरमुळे त्यांच्या तोंडून धड शब्दही फुटत नाही.. मात्र नातवावरचं प्रेम एवढं की आजी फक्त नातू-नातू एवढीच हाक मारतायेत....

ज्या हातांनी नातवाला घास भरवले, त्याचे लाड पुरवले, अंगाखांद्यावर खेळवत मोठे केले त्या आजीला आजार झाल्यानंतर तिच्या देहाचा इतका तिरस्कार तरी कसा करावासा वाटतो की तिला थेट कचऱ्यात फेकावं. हात क्षणभरही थरथरत नाहीत ? रक्ताची नाती इतकी कठोर कशी होतात.? स्वार्थापोटी मन एवढी कशी निर्ढावतात..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT