टेकऑफआधी 'ती' माहिती मिळाली; वाचले १७७ प्रवाशांचे प्राण, पायलटच्या कृतीचे सर्वत्र कौतुक, काय घडलं?

Indigo Flight : चंदीगडहून लखनऊला इंडिगोचे विमान तांत्रिक बिघाड झाले. टेकऑफ होण्याआधी ही माहिती मिळाल्यानंतर विमानाच्या पायलटने उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेतला.
Indigo Flight
Indigo Flightx
Published On

Ahmedabad Plane Crash दुर्घटनेनंतर विमान प्रवासाबाबत लोकांमध्ये भीती पाहायला मिळत आहे. दुर्घटनेच्या वेळेस एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. काही तासांपूर्वी आणखी एका विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. पायलटच्या जागरुकतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगडच्या शहीद भगत सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर लखनऊला जाण्यासाठी इंडिगोचे विमान टेकऑफ करणार होते. पण पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर विमानाचे उड्डाण रोखण्यात आले. त्यानंतर विमानामधील सर्व १७७ प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

Indigo Flight
Air India च्या विमानात चढण्यासाठी पठ्ठ्या चक्क मुंबई विमानतळाच्या रनवेवर धावला, नंतर जे घडलं त्यानं...

इंडिगोचे विमान तब्बल तासभर धावपट्टीवर उभे होते. टेकऑफ न झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. हे विमान सकाळी ७.१० ला लखनऊसाठी निघणार होते. पार्किंगच्या जागेतून विमान धावपट्टीवर नेत असताना पायलटला विमानामध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आले. त्यानंतर धावपट्टीवरुन विमान पुन्हा पार्किंगच्या जागी नेण्यात आले.

Indigo Flight
One Night Stand नंतर प्रेग्नेंसी, मग गर्भपात; प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक वक्तव्य, सिनेसृष्टीत खळबळ

फ्लाईट अचानक रद्द झाल्याने प्रवासी वैतागले. सर्व प्रवासी विमानात बसल्यानंतर तासभर विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. या दरम्यान विमानात बसलेल्या प्रवाशांना काहीच माहिती देण्यात आली नव्हती. त्यानंतर उड्डाण रद्द झाल्याचे प्रवासांना सांगण्यात आले. यादरम्यान इंडिगोने प्रवाशांना अन्य विमान सेवेचा पर्याय उपलब्ध करवून दिला. तसेच रिफंड देण्याचेही कबूल केले.

Indigo Flight
रोहित शर्मा कसोटीपाठोपाठ वन डेतूनही निवृत्त? २३ जूनचा साधला मुहूर्त; इंस्टा पोस्टने वेधले लक्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com