One Night Stand नंतर प्रेग्नेंसी, मग गर्भपात; प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक वक्तव्य, सिनेसृष्टीत खळबळ

Entertainment News : 'द सेक्रेड गेम्स' या लोकप्रिय वेबसीरीजमध्ये अभिनेत्री कुब्रा सैतने कुकू ही भूमिका केली होती. या भूमिकेमुळे कुब्राला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सध्या तिच्या एका वक्तव्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
Entertainment News
Entertainment Newsx
Published On

नेटफ्लिक्सवरील 'द सेक्रेड गेम्स' ही वेबसीरीज खूप गाजली. या वेबसीरीजच्या माध्यमातून ओटीटी विश्वाची सुरुवात झाली असेही म्हटले जाते. सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची जुगलबंदी असलेली ही वेबसीरीज प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या सीरीजमध्ये अभिनेत्री कुब्रा सैतने कुकू ही भूमिका केली होती. या आव्हानात्मक भूमिकेमुळे कुब्रा सैतला खूप प्रसिद्धी मिळाली.

कुब्रा सैतने केलेल्या एका विधानाची सध्या चर्चा पाहायला मिळाली. तिने वन नाईट स्टँडचा अनुभव शेअर केला होता. वन नाईट स्टँडनंतर कुब्रा गरोदर झाली होती. यानंतर लगेचच तिने अबॉर्शन करण्याचा निर्णय घेतला. एका कार्यक्रमामध्ये मुलाखतीदरम्यान कुब्रा सैतनने वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या.

Entertainment News
रोहित शर्मा कसोटीपाठोपाठ वन डेतूनही निवृत्त? २३ जूनचा साधला मुहूर्त; इंस्टा पोस्टने वेधले लक्ष

'मी वयाच्या ३० व्या वर्षी अंदमानला सहलीसाठी गेले होते. तिने मी स्कूबा डायव्हिंग केले. तो अनुभव फारच सुखद होता. सहलीमध्ये फिरत असताना मी काही डिंक्स घेतले आणि माझ्या एका मित्रासोबत वन नाईट स्टँड केला. काही दिवसांनी मी प्रेग्नेंट आहे हे मला समजले. प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एका आठवड्यानंतर अबॉर्शन करण्याचा निर्णय घेतला', असे कुब्रा सैत म्हणाली होती.

Entertainment News
Accident : मीरा भाईंदरमध्ये हिट अँड रनचा थरार! मद्यधुंद चालकाचा हैदोस, धडकीत वाहनांचा चक्काचूर

'अबॉर्शनच्या निर्णयासाठी एक व्यक्ती म्हणून मी तयार नव्हते. त्यावेळी मला आतून खूप खाली-खाली वाटत होते. अबॉर्शन न करता मी राहू शकेन की नाही याचा मी विचार करु शकत नव्हते. मी गरोदरपणाबद्दल कोणालाही, काहीही सांगितले नाही आणि एकटी जाऊन अबॉर्शन केले. न राहावल्याने एका मैत्रिणीला या प्रकाराबद्दल सांगितले आणि मी रडू लागले', असे मुलाखतीत कुब्राने म्हटले होते.

Entertainment News
Cricket : यशस्वी जैस्वाल नाही तर 'हा' खेळाडू सोडणार मुंबई संघाची साथ, MCA ला पत्र लिहित म्हणाला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com