Rishabh Pant : इतिहास रचला! रिषभ पंतनं करून दाखवलं; इंग्लंडमध्ये २ डावांमध्ये २ शतके
Ind Vs Eng 1st Test : इंग्लंडमध्ये तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी २०२५ चा पहिला सामना सुरु आहे. सामन्याचा चौथा दिवस सुरु आहे. चौथ्या दिवशी केएल राहुल पाठोपाठ रिषभ पंतने देखील शतकीय खेळी केली आहे. या शतकासह उपकर्णधार पंतने अनेक विक्रम केले आहे. एकाच सामन्यात दोन डावांमध्ये शतक ठोकणारा रिषभ पंत पहिला क्रिकेटपटू बनला आहे.
पहिल्या डावामध्ये खेळताना रिषभ पंतने १७८ चेंडूंमध्ये १३४ धावा केल्या. यात सहा षटकार आणि बारा चौकार यांचा समावेश आहे. संघातील अन्य खेळाडूंच्या पेक्षा जास्त स्ट्राईक रेट पंतचा होता. पहिल्या डावाप्रमाणे, दुसऱ्या डावामध्येही पंतने शतक ठोकले. १४० चेंडू खेळताना पंतने तीन षटकार आणि पंधरा चौकार मारत ११८ धावा केल्या. ८४.२९ इतक्या स्ट्राईकरेटने पंत खेळत होता.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर फलंदाजी करण्यावरुन पंतला ओरडले होते. पण भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात एक नव्हे तर दोनदा शतक करुन रिषभ पंतने गावस्कर यांचे मन जिंकले. पहिल्या डावात १०० धावा पार केल्यानंतर पंतने कोलांटी उडी मारत सेलिब्रेशन केले होते, दुसऱ्या डावात शतक पूर्ण केल्यानंतर गावस्कर यांनी पंतला पुन्हा कोलांटी उडी मारुन सेलिब्रेट करण्यास सांगितले. यादरम्यानचा त्या दोघांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पहिल्या डावात भारताने ४७१ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने फलंदाजी करताना ४६५ धावा केल्या. फलंदाजी सुरु होण्यापूर्वी भारताकडे फक्त सहा धावांची आघाडी होती. त्यानंतर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल मैदानात उतरले. जैस्वाल लवकर बाद झाला. साई सुदर्शनने ३० धावा केल्या. साईच्या विकेटनंतर गिल फलंदाजीला आला. लगेच तोही बाद होऊन माघारी परतला. केएल राहुल आणि रिषभ पंत यांनी परिस्थितीला अनुसरुन फलंदाजी करत भारताचा डाव सावरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.