KL Rahul : केएल राहुलनं इंग्लंडच्या गोलंदाजांना दमवलं; संयमी फलंदाजी करत ठोकलं शतक, टीम इंडिया भक्कम स्थितीत

Ind vs Eng 1st Test : इंग्लंडच्या लीड्समधील हेडिंग्ले स्टेडियमवर सध्या भारत विरुद्ध इंग्लंड सामना रंगला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात केएल राहुलने शतक ठोकले आहे.
KL Rahul
KL Rahul x
Published On

Ind Vs Eng कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसात केएल राहुलने शतकीय खेळी केली आहे. भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना राहुल ४२ धावांवर बाद झाला होता. पण दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने खणखणीत शतक ठोकले आहे. केएल राहुल आणि रिषभ पंत यांच्या भागीदारीमुळे भारताची धावसंख्या २५० पार गेली आहे.

पहिल्या दोन दिवसात यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि रिषभ पंतने शतकीय कामगिरी केली. पण दुसऱ्या डावात रिषभ पंत व्यक्तिरिक्त कोणीच मैदानात टिकलं नाही. यशस्वी जैस्वाल ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या साई सुदर्शनने ३० धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल ८ धावा करुन माघारी परतला. एका बाजूने विकेट पडत असताना केएल राहुलने बाजी सांभाळत फलंदाजी केली.

KL Rahul
रोहित शर्मा कसोटीपाठोपाठ वन डेतूनही निवृत्त? २३ जूनचा साधला मुहूर्त; इंस्टा पोस्टने वेधले लक्ष

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकला आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. सलामीवीर यशस्वी जैस्वालने १०१ धावा, कर्णधार शुभमन गिलने १४७ धावा आणि उपकर्णधार रिषभ पंतने १३४ धावा केल्या. पंतच्या विकेटनंतर भारताचे फलंदाज लागोपाठ बाद होत गेले. ४७१ धावांवर भारताचा संघ ऑलआउट झाला.

KL Rahul
Rishabh Pant : इतिहास रचला! रिषभ पंतनं करून दाखवलं; इंग्लंडमध्ये २ डावांमध्ये २ शतके

त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने ४६५ धावा केल्या. भारताच्या तोडीस तोड फलंदाजी इंग्लंडच्या फलंदाजांनी केली. ओली पोपने सर्वाधिक १०६ धावा केल्या, तर हॅरी ब्रुकचे शतक फक्त एका धावेने हुकले. तो ९९ धावांवर बाद झाला. भारताकडून नेहमीप्रमाणे जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी केली. त्याने इंग्लंडचे पाच फलंदाज बाद केले. त्याच्या पाठोपाठ प्रसिद्ध कृष्णाने ३ विकेट्स आणि मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेतल्या.

KL Rahul
Ind Vs Eng : मार कोलांटीउडी.. मार कोलांटीउडी.. सुनील गावस्करांनी पव्हिलियनमधून केला इशारा, रिषभ पंतने दिलं भन्नाट उत्तर; Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com