Mumbai Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबई हादरली! शेजारी राहणाऱ्या आजोबानेच केला घात, चाकू गळ्यावर ठेवत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Mumbai Police: मुंबईच्या धारावीमध्ये अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षीय व्यक्तीने चाकूचा धाक दाखवत लैंगिक अत्याचार केले. या घटनेमुळे मुंबई हादरली आहे.

Priya More

सचिन गाड, मुंबई

मुंबईमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी धारावी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासांत त्याला बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, धारावीमध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाले. ६० वर्षीय शेजाऱ्यानेच १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. दुपारच्या सुमारास घरामध्ये मुलगी एकटीच होती. याचाच फायदा घेत आरोपीने तिच्या घरामध्ये प्रवेश केला आणि चाकूचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

स्वतःची ओळख लपवण्यासाठी आरोपीने मास्क घालून मुलीवर लैंगिक अत्याचार केले. पण झटापटीत मास्क थोडा बाजूला झाल्याने तसेच अल्पवयीन मुलीने आवाज ओळखल्याने नराधमाचे बिंग फुटलं. आरडाओरड केल्यास गळा कापण्याची तसेच कोणाला काही सांगितल्यास ॲसिड फेकण्याची धमकी आरोपीने दिली होती. गळ्यावर चाकू ठेवल्यामुळे अल्पवयीन मुलीच्या गळ्याला जखमा झाल्या आहेत.

या घटनेप्रकरणी पीडित मुलीने कुटुंबीयांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ धारावी पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलम ४, ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली. आज आरोपीला कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. या घटनेमुळे मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बारवी धरण 'ओव्हरफ्लो', धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

Maharashtra Rain Update : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर; पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण? जाणून घ्या

Money Saving Tips : या 5 गोष्टी तुम्ही चुकूनही खरेदी करु नयेत

मुंबईत गोविंदाचा मृत्यू, तोल गेला अन् खाली कोसळला; सणाला गालबोट

Maharashtra Politics: महायुतीच्या दोन्ही दादांमध्ये जुंपली; सोन्याच्या चमचावरून अजितदादा अन् चंद्रकातदादांमध्ये जुगलबंदी

SCROLL FOR NEXT