Mumbai Water Supply : मुंबईत दोन दिवस पाणीबाणी; शहरातील 'या' विभागात पाणीपुरवठा बंद राहणार, वाचा सविस्तर

Mumbai News in Mumbai : मुंबईत दोन दिवस पाणीबाणी राहणार आहे. मुंबईतील काही विभागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मुंबईत दोन दिवस पाणीबाणी; शहरातील 'या' विभागात पाणीपुरवठा बंद राहणार, वाचा सविस्तर
Mumbai Water Supply Saam tv
Published On

सूरज मसूरकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मुंबईत तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुंबईतील के पूर्व आणि के पश्चिम विभागात निगमवाहिनीवरील वॉल्व्ह बदलण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. १९ सप्टेंबर ते २० सप्टेंबरपर्यंत पाणीपुरठवा बंद राहणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्यचं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे. तसेच पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे.

पालिकेच्या के पूर्व विभागातील वेरावली जलाशय-२ येथे ७५० मिलीमीटर व्यासाच्या पार्ले वेसावे येथील निगमवाहिनीवरील चार वॉल्व्ह बदलण्यात येणार आहेत. १९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ८ वाजेपासून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी २० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजेदरम्यान हे काम केले जाणार आहे. त्यामुळे, या कालावधी दरम्यान के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मुंबईत दोन दिवस पाणीबाणी; शहरातील 'या' विभागात पाणीपुरवठा बंद राहणार, वाचा सविस्तर
BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;या पदासाठी सुरु आहे भरती;पात्रता आणि पगार किती? जाणून घ्या

कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?

के पूर्व - महाकाली मार्ग, पूनम नगर, गोनी नगर, तक्षशिला मार्ग, एमएमआरडीए वसाहत, दुर्गा नगर, पेपर बॉक्स, मालपा डोंगरी क्रमांक ३, शेर ए पंजाब, बिंद्रा संकूल, हंजर नगर, गणेश नगर, शोभना परिसर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ४.३० ते सकाळी ७.५० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

के पूर्व - सुंदर नगर, गौतम नगर, मॉडर्न बेकरी, प्रजापूरपाडा (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - पहाटे ५.०० ते सकाळी ८.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

के पूर्व - त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, अचानक कॉलनी, कलेक्टर कंपाऊंड, सारीपूत नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी ८.०० ते सकाळी १०.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

के पूर्व – दुर्गानगर, मातोश्री क्लब (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

के पश्चिम- सी.डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी मार्केट, भर्डावाडी, नवरंग सिनेमाच्या मागे, अंधेरी गावठाण, आंब्रे गार्डन पंप व गझदर पंप, गिल्बर्ट हिलचा काही भाग, तीन नळ, गावदेवी डोंगरी मार्ग, उस्मानिया डेअरीचा काही भाग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी ७.३० ते दुपारी १२.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

मुंबईत दोन दिवस पाणीबाणी; शहरातील 'या' विभागात पाणीपुरवठा बंद राहणार, वाचा सविस्तर
BMC अधिकाऱ्याचा अजब कारनामा, ६० हजार रुपये टॉयलेटमध्ये केले फ्लश, ACB नेही गटारातून पैसे केले जप्त, पाहा काय घडलं?

दरम्यान, या कामाच्या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. तसेच पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे. या दुरुस्ती कामानंतर नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर ४ ते ५ दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे पालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com