BMC अधिकाऱ्याचा अजब कारनामा, ६० हजार रुपये टॉयलेटमध्ये केले फ्लश, ACB नेही गटारातून पैसे केले जप्त, पाहा काय घडलं?

Mumbai Crime News : एसीबीने सापळा रचत कारवाई केली. या कारवाईत अडकलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने ६०,००० रुपयांची स्वीकारलेल्या लाचेची रक्कम टॉयलेटमध्ये टाकून फ्लश केली.
Money
Money
Published On

Mumbai Crime News : मुंबईतील बीएमली अधिकाऱ्याचा अजब कारनामा सध्या चर्चेत आहे. एसीबी (Anti-Corruption Bureau) धाड मारण्यासाठी आल्यानंतर अटक होण्याच्या भीतीने एका अधिकाऱ्याने चक्क भ्रष्टाचाराचे ६० हजार रुपये चक्क टॉयलेटमध्ये फ्लश केले. पण एसीबीच्या अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर ड्रेनेज चेंबर तपासून पैसे जप्त करण्यात आले.

एसीबीने सापळा रचत कारवाई केली. या कारवाईत अडकलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने ६०,००० रुपयांची स्वीकारलेल्या लाचेची रक्कम टॉयलेटमध्ये टाकून फ्लश केली. पकडले जाण्याच्या भीतीने त्याने तब्बल ६०,००० रुपये फ्लश केले.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ड्रेनेज चेंबर तपासून ५७,००० रुपये जप्त केले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल इमारातीमधील २० ड्रेनेज चेंबर तपासले. त्यानंतर त्यांनी ५७ हजार रक्कम जप्त केली. एसीबी पथकाने प्रल्हाद शितोळे नावाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक केली.

एका हॉटेलच्या पीएनजी कनेक्शनसाठी तसेच ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी त्या अधिकाऱ्याने लाच घेतली होती. त्या अधिकाऱ्याने संबधित व्यक्तीला १.३० लाख रुपयांची लाच मागितली होती. पण तडजोडअंती साठ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केलं.

Money
Pune News : वनराज आंदेकर यांच्या हत्येचं धक्कादायक कारण उघड; गोळीबाराचा VIDEO आला समोर, तिघांना अटक

लाचेची रक्कम कार्यालयाच्या लिफ्टमध्ये स्वीकारली. मात्र, त्यांना एसीबीची धाड पडणार असल्याचा संशय आला. त्यांनी तात्काळ घरातील टॉयलेटमध्ये पैसे फ्लश केले. सापळा कारवाई यशस्वी करण्यासाठी एसीबीच्या अधिकाऱ्यांना घ्यावी लागली होतो प्लंबरची मदत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com