Mumbai Crime News : मुंबई हादरली! गोरेगावमध्ये ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; २९ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai Goregaon Crime News : मुंबईतही एक संतापजनक घटना घडली. शेजाऱ्याच्या घरी खेळायला गेलेल्या ४ वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला.
Mumbai Goregaon Crime News
Mumbai Goregaon Crime NewsSaam TV
Published On

Sachin Gaad Saam TV

बदलापूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता मुंबईतही एक संतापजनक घटना घडली. शेजाऱ्याच्या घरी खेळायला गेलेल्या ४ वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. इतकंच नाही, तर तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली. त्याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Goregaon Crime News
Crime News : संतापजनक! विवाहितेला दारू पाजली, फुटपाथवरच बलात्कार केला; लोकांनी VIDEO बनवले अन् व्हायरल केले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकलीवर अत्याचाराची ही घटना गोरेगावच्या (Mumbai Crime News) प्रेमनगर परिसरात घडली. आरोपी हा २९ वर्षीय असून तो पीडितेच्या घराशेजारी राहतो. कुटुंबियांची चांगली ओळख असल्याने पीडिता नेहमी आरोपीच्या घरी खेळायला जायची. याचाच फायदा घेऊन आरोपीने घरात कुणी नसताना पीडितेवर लैंगिक अत्याचार केला.

पीडित चिमुकली आरोपीच्या घरी गेल्यानंतर आरोपीने तिच्या शरीराचे लचके तोडले. घडलेली घटना कुणालाही सांगितल्यास तुझ्या आई-वडिलांना जीवे मारेल, अशी धमकी देखील आरोपीने पीडितेला दिली. घडलेल्या प्रकारानंतर पीडितेची तब्येत बिघडली. आईने तिची पाहणी केली असता चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले.

त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य पाहता गोरेगाव पोलिसांनी (Goregaon Police) तातडीने आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. अत्याचारानंतर पीडितेला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त होत आहे.

कोल्हापुरात ९ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

कोल्हापूर शहरातील राधानगरी परिसरातही एका ९ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. खासगी क्लासमध्ये शिकणाऱ्या एका ७३ वर्षीय आरोपीने पीडितेसोबत संतापजनक कृत्य केलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. श्रीपती भोसले, असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Mumbai Goregaon Crime News
Pune News : लग्नाचे वचन देऊन ३२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, जबरदस्तीने गर्भपातही केला; पुण्यातील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com