तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी
धारावीच्या पुनर्वसनावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारला टार्गेट केलंय. मुंबईचा शत्रू म्हणजे माझा शत्रू असा इशारा देत धारावी विल्हेवाट लावू देणार नसल्याचं त्यांनी बजावलंय. तसंच पवारही मुंबईची वाट लावू देणार नाही असं त्यांनी नमूद केलंय. धारावीवरून रंगलेल्या राजकारणावरचा हा रिपोर्ट ...
धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पावरुन महाविकास आघाडीने महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. धारावीकरांना आहे तिथंच घर मिळावीत असं सांगत आपण मुंबईत एका धारावीच्या 20 धारावी होऊ देणार नसल्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतलीय. मुंबईतल्या धारावीकरांचा शत्रू हा माझा शत्रू असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 3 दिवसीय नवी दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते विविध पक्षांच्या नेत्यांशी भेटीगाठी घेणार आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी धारावीच्या मुद्यावरुन पुन्हा अदानी यांना टीकेचं लक्ष्य केलं.गेल्या काही दिवसांपासून पुन्हा उद्धव ठाकरेंनी धारावी प्रकऱणी सरकारवर आरोपांची राळ उठवलीये. त्यात एकनाथ शिंदे - शरद पवारांच्या भेटीत अदानींचे अधिकारी होते अशी माहिती आहे. त्यावर विचारले असता त्यांनी सूचक विधान केलं.
मुंबईचं राजकारण शिवसेने भोवती फिरतंय..शिवसेनेत फुट पडली असली तरी मुंबईत ब्रँड ठाकरे आजही खणखणीत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ठाकरे करतायत..यासाठी धारावीच्या मुद्द्यावरुन ठाकरे सातत्यानं आक्रमक होत असून महायुतीला आणि पर्यायानं भाजपला मुंबईत शह देण्याचा प्रय़त्न ठाकरेंचा आहे. त्यामुळेच आता ठाकरे अदानी आणि भाजपचे सर्वश्रृत संबंधांकडे बोट दाखवत मुंबईचा शत्रू ठरवण्याचा नॅरेटीव्ह सेट करण्याची रणनीती आखत असल्याची चर्चा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.