Vidhan Sabha Election : शिवस्वराज्य यात्रेला ९ ऑगस्टपासून सुरुवात; 'राष्ट्रवादी' लढत असलेल्या त्या ३१ मतदारसंघातून पहिल्या टप्प्यात निघणार यात्रा

NCP Shivswarajya Yatra/Maharashtra Politics 2024 : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ९ ऑगस्टपासून शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी लढत असलेल्या ३१ मतदारसंघातून पहिल्या टप्प्यात ही यात्रा जाणार आहे.
Vidhan Sabha Election
Vidhan Sabha ElectionSaam Digital
Published On

आगामी विधानसभा निवडणुकांचं वातावरण आतापासूनच तापलं आहे. सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. विधानसभेच्या ज्या जागा शरद पवार गटाकडून लढवल्या जाणार आहेत, त्या मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात करणार असल्याची माहिती आज जयंत पाटील यांनी दिली. या यात्रेच्या पहिल्या ३१ मतदारसंघांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई, कोकण मराठवाडा अशा इतर भागांत देखील यात्रा जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Vidhan Sabha Election
Jarange On Narayan Rane : 'भुजबळ गायब, नारायण राणे येतायेत'; टप्प्यात येऊ देत करेक्ट कार्यक्रम करतो, जरांगेंचं खुलं आव्हान

शिवस्वराज्य यात्रेतील पहिल्या टप्प्यातील मतदारसंघ

१. जुन्नर

2. आंबेगाव

3. खेड आळंदी

4. भोसरी

5. शिरूर

6. हडपसर

7. खडकवासला

8. दौंड

9. इंदापूर

10. बारामती

11. माळशिरस

12. मोहोळ

13. सोलापूर उत्तर

14. माढा

15. करमाळा

16. परांडा

17. तुळजापूर

18. उदगीर

19. अहमदनपूर

20. केज

21. आष्टी

22. बीड

23. माजलगाव

24. परळी

25. गंगाखेड

26. पाथरी

27. जिंतूर

28. बसमत

29. घनसावंगी

30. बदनापूर

31. भोकरदन

राज्यातील तरुणांचे रोजगार गेले आहेत अधोगतीकडे राज्य गेलं आहे. महाराष्ट्रातील युती सरकारचे काळे कारणामे घेऊन जनतेत जाणार आहोत. पुन्हा एकदा बहुजनांचं रयतेचं राज्य निर्णाण करणार आहोत. लोकसभेत ३१ जागांवर भाजप आणि मित्र पक्षांचा पराभव झाला आहे. त्यामुळे भीतीपोटी सरकार घोषणा करत आहे. ऑक्टोबरमध्ये संपणारा कार्यकाळ हे सरकार नोव्हेंबरमध्ये घेऊ इच्छित आहे. पैसे वठणायचं काम करणार आहे.

दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर कोणत्या पद्धतीने चालणार हे जनतेसमोर मांडणार आहे. ९ तारखेला आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून महाराजांचे आशिर्वाद घेऊन शिवस्वराज्य यात्रा सुरु करणार आहे.९ ऑगस्ट जगतिक आदिवासी दिवस आहे आणि चले जावचा नारा ऑगस्ट क्रांती मैदानातून दिला आहे, त्यामुळे या दिवशी शिवस्वराज्य यात्रेला सुरूवात करण्यात येणार आहे.

यात्रेचा पहिला टप्पा

११ ऑगस्ट पुणे

१२ -१३ सोलापूर आणि उस्मानाबाद

१४ लातूर

१५-१६ बिड

१७ जालना

पहिला टप्पा संपताच पुढच्या दोन दिवसात दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. या यात्रेत नव्याने निवडून आलेलं ८ ही खासदार असणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com