Mumbai Local Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या, तो भोसकत राहिला मुंबईकर बघत राहिले

Mumbai Local Crime: मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. दरवाजा लावण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली.

Priya More
  • मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या

  • २२ वर्षीय मयांक लोहारची हत्या करण्यात आली

  • दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून घडली घटना

  • आरोपीने मयांकवर चाकू हल्ला केला

सुप्रिम मसकर, साम टीव्ही

मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्याला कारण ठरलयं धावत्या लोकलमध्ये एका 22 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून झालेली हत्या. लोकलमधील किरकोळ वाद हत्येपर्यंत कसा पोहचला? हे सगळं घडत असताना मुंबईकर काय करत होते ? पाहूयात यावर स्पेशल रिपोर्ट...

हा व्हिडिओ नीट पाहा. मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये हा नराधमानं एका 22 वर्षीय तरुणाचा धारदार चाकूनं खून केला आणि खच्चाखच भरलेल्या लोकलच्या डब्यात मुंबईकर प्रवासी केवळ बघत राहिले. या खुनीला अडवण्यासाठी कोणीही पुढं आलं नाही. अत्यंत किरकोळ वादातून ही हत्या झाली. बाहेर पाऊस सुरू होता. त्यामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्याची विनंती मयांक लोहार या तरुणानं दरवाजात उभ्या असलेल्या आरोपीला केली. मात्र या माथेफिरून थेट चाकू काढला आणि मयांकच्या पोटात भोसकला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयांकचा धावत्या लोकलमध्येच मृत्यू झाला. या हत्याकांडाचा घटनाक्रम पाहूयात...

लोकलमधील वादातून तरुणाची हत्या, वाचा घटनाक्रम -

23 जून

रात्री 10.45 वा.

मृत मयांक लोहार आणि आरोपी अंधेरी स्टेशनवर मधल्या फर्स्ट क्लास डब्यात चढले

रात्री 10.47 वा.

लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून दोघांमध्ये वाद

रात्री 10.50 वा.

वादातून गोरेगाव-कांदिवलीदरम्यान मयांकची चाकूनं भोसकून हत्या

रात्री 11.04 वा.

लोकल बोरीवली स्थानकात दाखल झाली, चालत्या गाडीतून आरोपी फरार

24 जून

दुपारी 3 वाजता

कुर्ल्यातून लोहमार्ग पोलिसांकडून आरोपी रोशन सुवर्णाला अटक

मयांकच्या हत्येनंतर त्याच्या आईनं अक्षरशा टाहो फोडलाय. मात्र या हत्येमुळे पुन्हा एकदा मुंबईकरांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत की काय असा प्रश्न निर्माण झालाय. मयांकला आरोपी धारदार चाकूनं भोसकत असताना लोकलमधील इतर लोक मयांकला वाचवण्यासाठी पुढे का आले नाहीत? असा सवाल मयांकच्या बहिणीनं उपस्थित केलाय.

मात्र मुंबई लोकलमधील हत्याकांडाची ही काही पहिली घटना नाही. याआधी पाच महिन्यांपूर्वी प्रोफेसर आलोक सिंग यांचा मालाड स्टेशनवर उतरत असताना, किरकोळ धक्का लागल्याच्या वादातून एका प्रवाशानं धारदार चाकू खुपसून त्यांची हत्या केली होती. तर, आता पुन्हा एकदा किरकोळ वादातून हत्या झालीय. रोज लाखो प्रवासी लोकलमधून प्रवास करतात.

या घटनेनंतर लोकलमधील सुरक्षारक्षकांचा कमतरतेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मात्र ज्या फर्स्ट क्लासच्या डब्ब्यातून आरोपी आणि मयांक लोहार प्रवास करत होते. त्या लोकलच्या डब्यात इतके प्रवाशी असताना मयांकला वाचवण्यासाठी कुणीच पुढे का आलं नाही? सर्वांनी एकत्र येऊन आरोपीला विरोध केला असता तर मयांक वाचला असता. त्यामुळे मुंबईकरांच्या मेलेल्या संवेदनांचा मयांक बळी ठरलाय का? आणि यापुढेही असेच बळी जात राहणार का? हा गंभीर प्रश्न लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकासमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या ६ बंडखोर खासदारांबाबत पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णय?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी जमा? पाहा नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, कर्कीसह अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस

बांगड्यांचा ढिग अन् नेकलेस; ZP सदस्याकडे पोलिसांना सापडलं 4 कोटी रुपये किंमतीचे ३ किलो सोन्याचे दागिने

Shocking: महिला नेत्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह, बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT