Fact-Check: खासदार कंगना रनौतला चोपलं?; Gen Z ना गटारछाप बोलल्याने मारहाण?

Gen Z Attack Kangana Ranaut : आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. जेन झीला गटारछाप म्हटल्यामुळे कंगना रनौतला मारहाण केल्याचा दावा करण्यात आलाय...तसा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय...पण, खरंच जेन झींनी कंगनाला मारहाण केलीय का...? याची आम्ही पडताळणी केली..त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात
Fact-Check:  खासदार कंगना रनौतला चोपलं?;  Gen Z ना गटारछाप बोलल्याने मारहाण?
Published On

भाजप खासदार कंगना रनौतला मारहाण केल्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आलाय...गाडीतून उतरताच काही महिलांनी मारहाण करत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय.पण, व्हिडिओत दिसत असलेली खरंच कंगना आहे का?

...Gen Z ला गटारछाप बोलल्याने कंगनाला मारहाण केल्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केल्याने प्रचंड व्हायरल होतोय.गाडीतून उतरताच जमावाने हल्ला केल्याचा व्हिडिओ शेअर केला जातोय...जेन जींवर विधान केल्याने कंगनावर हल्ला केल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच कंगनाला मारहाण झालीय का? हा व्हिडिओ कुठला आहे...? कधीचा आहे...? हा व्हिडिओ आम्ही नीट पाहिला...मास्क लावलेली महिला ही कंगनाच आहे का...? याची आम्ही पडताळणी केली.त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/साम इन्व्हिस्टिगेशन

खासदार कंगना रनौतला मारहाण झालेली नाही

व्हायरल व्हिडिओतील महिला कंगना नाही

मारहाण झालेली महिला तृणमूल काँग्रेसच्या प्रणयिता दास

30 जुलैला दास यांना पोलीस स्टेशन बाहेर मारहाण झाली

व्हायरल व्हिडिओवर पश्चिम बंगालमधील 'JDN News' या वृत्तवाहिनीचा लोगो आहे...हा व्हिडिओ 30 जुलैला त्यांच्या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आल्याचं आढळलं...व्हिडिओमधील महिला प्रणयिता दास आहेत... तृणमूल काँग्रेसचे नेते कृष्ण दास यांची ती मुलगी आहे...बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराशी संबंधित एका प्रकरणात प्रणयिता दास पोलीस स्टेशनला गेल्या होत्या...त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अंडी फेकली आणि निदर्शने केली...कंगना रणौतच्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर हल्ला झाल्याचं कुठेही आढळलं नाही...त्यामुळे आमच्या पडताळणीत कंगना रणौतला मारहाण झाल्याचा दावा असत्य ठरलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com