GEN-Z आंदोलक गटारछाप; भाजप खासदार कंगना रनौत बरळली

BJP MP Kangana Ranaut Targets Gen Z Protesters : जेन-झीच्या आंदोलनामुळे संपूर्ण देश ढवळून निघालाय. त्यात सत्ताधारी भाजपकडून जेन-झींवर आगपाखड केली जातेय. भाजप खासदार कंगना रनौतनं पोस्ट करत जेन-झींना गटारछाप असं संबोधलंय. तर सीजेपीनंही कंगनाला खोचक टोला लगावलाय. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.
BJP MP Kangana Ranaut Targets Gen Z Protesters
Kangana Ranaut-gen Z Row: Bjp Mp’s ‘gutter-level’ Remark Sparks Controversy, Cjp Hits Back
Published On
Summary
  • कंगना रनौत जेन झी आंदोलकांबाबत वादग्रस्त विधान

  • जेन झी आंदोलकांना गटारछाप म्हणाल्या कंगना रनौत

  • कंगना रनौत यांच्या पोस्टवर सीजेपीचा पलटवार

जंतर मंजरवरील आंदोलन संपल्यानंतर भाजपच्या निशाण्यावर आता जेनझी आले आहेत. सीजेपी आंदोलनावरून भाजप खासदार कंगना रनौत बरळलीये. जंतरमंतरवरील आंदोलनावरून कंगनानं जेन-झींवर आगपाखड करण्यास सुरूवात केलीये. कंगनानं सोशल मीडियावर पोस्ट करून जेन-झींना लक्ष्य केलंय. कंगनानं आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात.

BJP MP Kangana Ranaut Targets Gen Z Protesters
Uddhav Thackeray: तुम्ही कोणाच्या बाजुने, हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं का? उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना सवाल

मी त्यांना जनरेशन गटार म्हणते, तथाकथिक पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारलेल्या भारतीय मुलींची ही नवी जनरेशन आहे. या ना शिक्षणात सरस आहेत, ना सौंदर्यात. त्यांची मानसिकता इतकी विकृत असते की, त्या चांगल्या गृहिणीही बनू शकत नाहीत. समाजाला देण्यासारखं त्यांच्याकडे काहीही मोलाचं नसतं.

BJP MP Kangana Ranaut Targets Gen Z Protesters
देशाचे नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींवर राहुल गांधींचे गंभीर आरोप; प्रियांकांच्या वक्तव्यावरही गदारोळ, नेमकं कारण काय?

तरीही, ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांसोबत लैंगिक संबंध ठेवणं या गोष्टींमधील आपल्या 'स्वातंत्र्याचं' त्या अभिमानानं प्रदर्शन करतात. आई-बापाच्या कमाईवर जगत असतानाच त्या खऱ्या अर्थानं स्वावलंबी न होता, केवळ 'स्वतंत्र' आयुष्यासाठी धडपडत असतात. स्वतंत्र आयुष्य कमवावं लागतं, जबाबदाऱ्या न स्वीकारताच तुम्हाला स्वतंत्र्य आयुष्य जगायचं असेल, तर मग तुम्ही गटार छाप बावळट आहात. तर दुसरीकडे, सीजेपीसह विरोधकांनीही कंगनाला चोख प्रत्युत्तर दिलंय. विशेष म्हणजे, केरळमधील RSS नेत्यानंही CJP आंदोलकांबद्दल वादग्रस्त विधान केलंय.

आंदोलंकांशी संवाद साधायला हवा असं सल्ला स्वत: सरसंघचालक मोहन भागवतांनीही दिला होता. मात्र त्यांचेच नेते आंदोलकांबाबत बेताल विधानं करतातयंत. तर दुसरीकडे आंदोलन करणं हा नागरिकांचा मुलभूत अधिकार असूनही केवळ त्यांनी आंदोलन केलं म्हणून त्यांच्यावर पातळी सोडून टीका करणं खासदार कंगनाला शोभतं का? याचा विचार व्हायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com