Pradeep Rawat Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा

Pradeep Rawat Death: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते प्रदीप रावत यांचे आज, ४ ऑगस्ट रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 'महाभारत' ते 'गजनी' अशा विविध कलाकृतींमध्ये दमदार अभिनय केला होता.
Pradeep Rawat Death:
Veteran Bollywood actor Pradeep Rawat passes awaysaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.

'गजनी', 'लगान', 'सरफरोश' आणि 'महाभारत'मधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

ते दीर्घकाळ कॅन्सरशी झुंज देत होते आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

'लगान', 'सरफरोश' आणि 'गजनी' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधील दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे प्रसिद्ध अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन झालंय. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे सहकलाकार आणि जवळचे मित्र यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

प्रदीप रावत हे बऱ्याच काळापासून कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत होते. सुरुवातीला त्यांच्यावर मुंबईतील अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नंतर दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र प्रदीप रावत यांची मृत्यूशी असलेली झुंज अपयशी ठरली.

२१ जानेवारी १९५२ रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे जन्मलेल्या प्रदीप रावत यांनी १९८० च्या दशकात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. बी. आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' या पौराणिक मालिकेद्वारे त्यांना खरी ओळख आणि प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्यांनी गुरू द्रोणाचार्यांचा पुत्र असलेल्या अश्वत्थामा या अजरामर आणि प्रभावी व्यक्तिरेखेची भूमिका साकारली. त्यांचा दमदार आवाज आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व यांचा प्रेक्षकांवर इतका खोलवर प्रभाव पडला की, ते रातोरात चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख चेहरा बनले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com