Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

Actor Played 165 Roles In One Movie : आपण चित्रपटात दुहेरी किंवा तिहेरी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांबद्दल ऐकले असेल पण आज आपण एकाच चित्रपटात १६५ भूमिका साकारणाऱ्या कलाकाराबद्दल जाणून घेऊयात.
Actor Played 165 Roles In One Movie
Famous Actorsaam tv
Published On
Summary

प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कलाकार करतात जीवापाड मेहनत

प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या १६५ भूमिका

चित्रपट सोशल मीडियावर करतोय ट्रेंड

आजकालच्या चित्रपटात अनेक नाविन्य पाहायला मिळते. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी कलाकार जीवापाड मेहनत करतात. आजवर तुम्ही चित्रपटात डबल रोल, तिहेरी भूमिका पाहिल्या असतील पण सध्या सोशल मीडियावर अशा एका चित्रपटाची चर्चा सुरू आहे, ज्यात अभिनेत्याचे चक्क १०० च्यावर भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचा क्लायमॅक्सही चांगलाच गाजत आहे. एकाच चित्रपटात १०० च्या वर भूमिका करणारा हा अभिनेता आहे तरी कोण, जाणून घेऊयात.

मीडिया रिपोर्टनुसार, टिम बर्टन यांच्या २००५ मधील 'चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी' या चित्रपटात अभिनेते दीप रॉय यांनी तब्बल १६५ 'ऊम्पा-लूम्पा' (Oompa-Loompas) भूमिका साकारल्या होत्या. जेव्हा दिग्दर्शकाच्या लक्षात आले की, १९७१ साली प्रदर्शित झालेल्या याच चित्रपटाच्या आधीच्या आवृत्तीच्या तुलनेत त्यांना दीप रॉय यांच्यासारखे दिसणारे फारसे अभिनेते सापडत नाहीत. तेव्हा ही समस्या सोडवण्यासाठी अभिनेते दीप रॉय यांनीच पुढाकार घेतला. त्यांनी या चित्रपटात १६५ 'ऊम्पा-लूम्पा' (बुटके आणि मजेशीर पात्र) साकारले. मात्र यात त्यांना अनेक अडचणी आल्या.

Actor Played 165 Roles In One Movie
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

एकाच फ्रेममध्ये इतक्या भूमिका चित्रित करण्यासाठी, दिग्दर्शकाने दीप रॉय यांचे प्रत्येक व्यक्तिरेखेत स्वतंत्रपणे अनेक वेळा शूटिंग केले आणि नंतर त्यांना एकाच फ्रेममध्ये एकत्र केले. जरी सर्व पात्रे सारखी दिसत असली तरी, त्यांचे हावभाव आणि कृती वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे, दीप रॉय यांच्यासाठी हे अजिबात सोपे नव्हते.

चित्रपटाची आणखी एक खासियत

'चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी' या चित्रपटात चॉकलेटच्या नदीचे एक दृश्य आहे, जे चित्रपटातील सर्वात लोकप्रिय दृश्यांपैकी एक मानले जाते. हे दृश्य तयार करण्यासाठी निर्मात्यांनी एकूण १२.५ लाख लिटर चॉकलेट वापरून ते पाण्यासारखे खाली ओतले होते. हा चित्रपट सध्या जिओ हॉटस्टार आणि ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com