Kangana Ranaut: भाजपच्या मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात चर्चांना उधाण आणले आहे. संसदेच्या अधिवेशनासाठी रवाना होत असताना त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत त्यांनी स्वतःच्या विचारांबाबत भाष्य करताना काही मुद्दे मांडले आणि वैचारिक स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला. तसेच, एका अभिनेत्रीवर अप्रत्यक्ष टोला लावल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
कंगना रणौत यांनी आपल्या व्हिडिओमध्ये दावा केला की, चित्रपटसृष्टीतील अनेक हिंदू महिला सुरुवातीला राजकारण किंवा धर्माबाबत तटस्थ भूमिका घेतात. मात्र, काही विशिष्ट परिस्थितींनंतर त्यांच्या विचारसरणीत बदल होत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी असेही म्हटले की, एखाद्या इस्लामी व्यक्तीशी मैत्री, रिलेशन किंवा लग्न झाल्यानंतर काही महिलांचा कल डाव्या विचारसरणीकडे झुकतो. हा त्यांचा वैयक्तिक दृष्टिकोन असू शकतो, संविधान प्रत्येकाला स्वतःची विचारसरणी निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मग, जेव्हा एखादा सजग हिंदू हेच स्वातंत्र्य मागतो, तेव्हा त्याच्यावर प्रश्न का विचारले जातात.
आपल्यावर होणाऱ्या टीकेचाही त्यांनी उल्लेख केला. "मी पार्ट्याही करायचे. पण आज जर मला स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा असेल आणि आरएसएस (RSS) व भाजपच्या (BJP) विचारसरणी म्हणजेच एका जागरूक आणि शिस्तप्रिय हिंदूच्या विचारसरणीचे पालन करायचे असेल, तर माझ्यासाठी तो मार्ग का बंद केला जात आहे?"
हिंदू महिलांच्या वैचारिक स्वातंत्र्याचा मुद्दाही कंगना यांनी मांडला. कोणत्याही महिलेने आपल्या आयुष्यात बदल करण्याचा किंवा विशिष्ट विचारसरणी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, तर तिच्या भूतकाळावरून तिची 'अग्निपरीक्षा' घेणे योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या. प्रत्येकाला आपली निष्ठा, विचार आणि जीवनशैली निवडण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कंगना रणौत यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांच्या वक्तव्याचा संबंध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्याशी जोडला जात असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, या संदर्भात राखी सावंत यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.