Actor Death: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; मुलाने दिली निधनाची बातमी, सिनेविश्वाला मोठा धक्का

Actor Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याचे ८३व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मुलाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी दिली.
Veteran actor scott hylands passes away
Veteran actor scott hylands passes away Saam Tv
Published On

Actor Death: कॅनेडियन चित्रपट आणि मालिका विश्वातील ज्येष्ठ अभिनेते स्कॉट हायलंड्स यांचे वयाच्या ८३व्या वर्षी निधन झाले आहे. 'नाईट हीट' या लोकप्रिय क्राईम मालिकेतील डिटेक्टिव्ह केविन "ओ.बी." ओ'ब्रायन या भूमिकेमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली होती. तसेच 'फार्गो' या गाजलेल्या मालिकेतील त्यांच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्कॉट हायलंड्स यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा ल्यूक हायलंड्स याने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे दिली. वडिलांना श्रद्धांजली वाहताना त्याने लिहिले, स्कॉट हायलँड्स डग्लस (२७ फेब्रुवारी १९४३ - २९ जुलै २०२६) पती, वडील, अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, मित्र आणि जीवनावर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व. अत्यंत जड अंतःकरणाने मी ही बातमी सांगत आहे की, माझे वडील स्कॉट यांचे बुधवारी रात्री निधन झाले. या भीषण दुःखातून सावरण्याचा प्रयत्न मी आणि माझे कुटुंबीय करत आहोत. बाबा, तुमच्याबद्दल व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे सध्या पुरेसे शब्दच नाहीत.तुम्ही माझे 'हिरो' आणि माझे सर्वात जवळचे मित्र राहिला आहात. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे.

Veteran actor scott hylands passes away
Dombivli: डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून सुरु होणरा वॉटर मेट्रो; जाणून घ्या संपूर्ण माहिती

१९४३ मध्ये कॅनडातील अल्बर्टा प्रांतातील लेथब्रिज येथे जन्मलेल्या स्कॉट हायलंड्स यांचे बालपण व्हँकुव्हरमध्ये गेले. त्यांनी ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातून नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर रंगभूमीवर कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्यांनी न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को येथील रंगभूमीवर काम करत अभिनयाची भक्कम पायाभरणी केली. त्यानंतर चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Veteran actor scott hylands passes away
Shahapur Tourist Death: मुंबईहून फिरायला आला अन् काळाने केला घात; वरपडी नदीत २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

१९८५ ते १९८९ या कालावधीत प्रसारित झालेल्या 'नाईट हीट' या मालिकेने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेतील त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. याशिवाय 'द एक्स-फाइल्स', 'एनवायपीडी ब्ल्यू', 'सुपरनॅचरल', 'वायनोना अर्प' आणि 'फार्गो'सारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. अनेक दशकांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी चित्रपट, टीव्ही आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांत उल्लेखनीय योगदान दिले.

माध्यमांतील वृत्तांनुसार, २०२१ मध्ये स्कॉट हायलंड्स यांना रक्ताच्या कर्करोगाचे (Acute Myeloid Leukemia) निदान झाले होते. त्यांच्या निधनाचे नेमके कारण जाहीर करण्यात आलेले नसले तरी गेल्या काही वर्षांपासून ते प्रकृतीशी झुंज देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व्हेरोनिका, मुलगा ल्यूक आणि मुलगी रेबेका असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कॅनेडियन मनोरंजन क्षेत्रातील एक महत्त्वाचा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com