Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

Rajeev Verma: ‘मैने प्यार किया’मधील सलमान खानच्या वडिलांच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेले राजीव वर्मा हे जया बच्चन यांचे मेहुणे आहेत. त्यांनी यशाच्या शिखरावर असताना बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता.
Rajeev Verma
Rajeev VermaSaam Tv
Published On

Rajeev Verma: बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेते राजीव वर्मा. ‘मैने प्यार किया’, ‘हम साथ साथ हैं’, ‘बीवी नं. 1’ आणि ‘हम दिल दे चुके सनम’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी साकारलेल्या वडिलांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. विशेष म्हणजे, त्यावेळी अनेकांना ते खरोखरच सलमान खानचे वडील आहेत असे वाटायचे.

बच्चन कुटुंबाशीही खास संबंध

राजीव वर्मा यांचा बच्चन कुटुंबाशीही खास संबंध आहे. ते अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांच्या बहिणी रीता वर्मा यांचे पती आहेत. त्यामुळे ते बॉलिवूडचे शहंशाह ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे साडू भाऊ ठरतात. मात्र, इतक्या मोठ्या कुटुंबाशी नाते असूनही त्यांनी नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत केले.

Rajeev Verma
Marathi Serial: 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण

अभिनयाची सुरुवात

राजीव वर्मा यांनी अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी आर्किटेक्ट म्हणून शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्र आणि चित्रपटसृष्टीत पदार्पण केला. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैने प्यार किया’ चित्रपटामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्यांनी सलमान खानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांच्याकडे अशाच प्रकारच्या भूमिकांची रांग लागली.

Rajeev Verma
Actress Bath Video Leak: अभिनेत्रीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ लीक', टीव्ही शोमध्ये घडला भयानक प्रकार

चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय

मात्र, सतत एकाच प्रकारच्या भूमिका साकारताना त्यांना अभिनयातील नावीन्य हरवल्यासारखे वाटू लागले. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, अभिनय हळूहळू नोकरीसारखा वाटू लागला होता. पूर्वी मिळणारा आनंद आणि समाधान कमी झाले होते. याशिवाय कुटुंबीयांसोबत वेळ घालवता येत नसल्याची खंतही त्यांना सतावत होती. त्यामुळे त्यांनी मुंबई आणि चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

हॉटेल व्यवसाय

काही वर्षांपूर्वी ते आपल्या मूळ गावी भोपालला परतले. सध्या ते तेथे हॉटेल व्यवसाय सांभाळत असून नाट्यक्षेत्राशीही जोडलेले आहेत. ग्लॅमरच्या जगापासून दूर राहून साधे आणि समाधानी जीवन जगण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असतानाही स्वतःच्या आनंदासाठी आणि कुटुंबासाठी वेगळा मार्ग निवडणारे राजीव वर्मा सध्या त्यांच्या निर्णयामुळे सोशल मिडियावर ट्रेंडींग आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com