Shakira: फेमस पॉप क्वीन शकिरा भारत दौऱ्यावर? मुंबईसह पुण्यात लवकरच रंगणार म्युझिकल कॉन्सर्ट

Shakira: जागतिक पॉप स्टार शकिरा भारत दौऱ्यावर येण्याची चर्चा रंगली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये कॉन्सर्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Shakira
ShakiraSaam Tv
Published On

Shakira: लॅटिन पॉप संगीताची क्विन म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेली गायिका आणि नृत्यांगना शकिरा लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर तिच्या भारत दौऱ्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद या प्रमुख शहरांमध्ये तिचे म्युझिकल कॉन्सर्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या दौऱ्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

शकिरा ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय पॉप स्टार्सपैकी एक आहे. तिच्या गायनासोबतच भन्नाट डान्स स्टाईलमुळे तिने जागतिक स्तरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. भारतातही तिच्या गाण्यांचे लाखो चाहते असून, तिच्या लाइव्ह परफॉर्मन्सची अनेक वर्षांपासून चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

Shakira
Actress Death: सिनेसृष्टीला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेत्रीचे ब्रेन स्ट्रोकमुळे निधन, कुटुंबाने ४ महिने लपवली बातमी

फुटबॉल विश्वचषक २०२६शी संबंधित तिचे गाणे जागतिक स्तरावर गाजल्यानंतर हा तिचा पहिलाच मोठा आंतरराष्ट्रीय दौरा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भारतातील चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते शकिराच्या भारतातील कॉन्सर्टबाबत पोस्ट शेअर करत असून, तिकीट विक्री कधी सुरू होणार असे अनेक प्रश्न विचारत आहेत.

Shakira
Bigg Boss 20: सलमान खानची दमदार एन्ट्री! 'बिग बॉस २०'चा पहिला प्रोमो रिलीज; 'या' दिवशी होणार ग्रँड प्रीमियर

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील प्रमुख शहरांमध्ये तिच्या लाइव्ह शोचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद या शहरांचा संभाव्य यादीत समावेश असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, पुण्यातही शकिराचा कार्यक्रम होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने महाराष्ट्रातील चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com