Actress Death: सिनेसृष्टीला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेत्रीचे ब्रेन स्ट्रोकमुळे निधन, कुटुंबाने ४ महिने लपवली बातमी

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचे ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झाल्याची माहिती तब्बल चार महिन्यांनंतर समोर आली आहे. कुटुंबाने ही दुःखद बातमी गुप्त ठेवल्याने चाहते आणि सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.
 Actress Mary Rivera Passes Away
Actress Mary Rivera Passes AwaySaam Tv
Published On

Actress Death: मार्वलच्या सुपरहिट 'स्पायडर-मॅन: नो वे होम' या चित्रपटातील 'नेड लीड्स'च्या आजीच्या छोट्याशा पण लक्षवेधी भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या अभिनेत्री मेरी रिव्हेरा यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८२व्या वर्षी स्ट्रोक (मेंदूचा झटका) आल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन १५ एप्रिल रोजी झाले होते. मात्र, त्यांच्या कुटुंबातील सदस्याने नुकताच याला दुजोरा दिल्यानंतर ही माहिती सार्वजनिक झाली आहे.

'टीएमझेड'च्या वृत्तानुसार, मेरी रिव्हेरा यांचे निधन होनोलूलू, हवाई येथे झाले. स्ट्रोकनंतर त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. डॉक्टरांनी कुटुंबीयांना त्यांच्या प्रकृतीबाबत स्पष्ट कल्पना दिली होती. उपचारानंतरही त्या पूर्णपणे बऱ्या होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्या कोमामधून बाहेर आल्या तरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची आशा नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.

 Actress Mary Rivera Passes Away
Bigg Boss 20: सलमान खानची दमदार एन्ट्री! 'बिग बॉस २०'चा पहिला प्रोमो रिलीज; 'या' दिवशी होणार ग्रँड प्रीमियर

या कठीण परिस्थितीत कुटुंबीयांनी भावनिक निर्णय घेत त्यांना व्हेंटिलटरवरुन हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती अलेजांद्रो रिव्हेरा, मुले कार्मेला जोन्स, पॉल रिव्हेरा, एडविन रिव्हेरा आणि अँजेला केली, तसेच ११ नातवंडे आणि चार पणतवंडे असा मोठा परिवार आहे.

 Actress Mary Rivera Passes Away
Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; राहत्या घरी आढळला मृतावस्थेत, मनोरंजन विश्वात हळहळ

मेरी रिव्हेरा यांनी 'स्पायडर-मॅन: नो वे होम'मध्ये जरी काही मोजक्याच सीनमध्ये काम केले असले, तरी 'नेड लीड्स'च्या फिलिपिनो आजीची त्यांनी साकारलेली भूमिका चाहत्यांच्या विशेष लक्षात राहिली. या चित्रपटात त्यांनी टॉम हॉलंड, जेकब बॅटलन, झेंडाया, बेनेडिक्ट कंबरबॅच, अँड्र्यू गारफिल्ड, टोबी मॅग्वायर आणि इतर अनेक कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com