'तुम्ही कधीपर्यंत गुंगी गुडिया बनून राहणार?' काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना डिवचलं

Congress Targets Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा 'गुंगी गुडिया' असा उल्लेख केल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडलीये. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंवरही काँग्रेसने प्रहार केलाय. मात्र हा वाद कशामुळे पेटलाय? सुनेत्रा पवारांच्या बीडमधल्या पत्रकार परिषदेत मुंडेंनी नेमकं काय केलं? पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट.
CONGRESS VS NCP ROW: SUNETRA PAWAR PRESS CONFERENCE SPARKS MAJOR POLITICAL CONTROVERSY
CONGRESS VS NCP ROW: SUNETRA PAWAR PRESS CONFERENCE SPARKS MAJOR POLITICAL CONTROVERSY
Published On

ऐकलत, बीडमधील या पत्रकार परिषदेत पत्रकारानं बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना थेट प्रश्न विचारला. मात्र धनंजय मुंडेंनी हस्तक्षेप करत सुनेत्रा पवारांना उत्तर तर देऊ दिलेच नाही. मात्र पत्रकारालाही प्रश्न विचारण्यापासून रोखले. आणि नेमकं काय घडलं पुन्हा एकदा पाहूयात.

CONGRESS VS NCP ROW: SUNETRA PAWAR PRESS CONFERENCE SPARKS MAJOR POLITICAL CONTROVERSY
काँग्रेस प्रसिद्धीसाठी खालच्या स्तरावर उतरलीय; मुख्यमंत्री फडणवीस संतापले

या घटनेवरून काँग्रेसनं थेट सुनेत्रा पवारांवर निशाणा साधलाय. काँग्रेसनं ट्विट करून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया म्हणून उल्लेख केला. विशेष म्हणजे नाव न घेता धनंजय मुंडेंनाही गुंड प्रवृत्तीचा नेता असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. मात्र ते सोडून धनंजय मुंडेंनी सुनेत्रा पवारांबाबत काँग्रेसला द्वेष असल्याचा दावा करत मुळ मुद्दाला बगल दिली.

CONGRESS VS NCP ROW: SUNETRA PAWAR PRESS CONFERENCE SPARKS MAJOR POLITICAL CONTROVERSY
मनसेच्या कार्यालयात तुंबळ हाणामारी; राऊत यांना बेदम मारहाण, तालुकाध्यक्षावरही हल्ला

सपकाळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अजितदादांचा अपघात, राष्ट्रवादीकडून भाजपकडे गेलेलं अर्थखातं आणि इतर अनेक मुद्द्यांवर सुनेत्रा पवारांनी बाळगलेल्या मौनाचा मुद्याही अधोरेखित करत गुंगी गुडियाच्या उल्लेखाचं जोरदार समर्थन केलं. मात्र यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसली आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस कार्यालयात घुसून सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेत धुडगूस घातला. सपकाळ आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत माफीची मागणी केली.

गुंगी गुडिया या संकल्पनेचा जन्मच काँग्रेसमधून झालाय. समाजवादी नेते राम मनोहर लोहियांनी इंदिरा गांधीचा सुरूवातीच्या राजकीय कारकिर्दीत गुंगी गुडिया असा उल्लेख केला होता. मात्र इंदिरा गांधींनी त्यांच्या कर्तृत्वातून सर्व राजकीय विरोधकांना उत्तर दिलं. त्यामुळे सुनेत्रा पवारही त्यांचा कित्ता गिरवणार का? हा प्रश्न आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं ज्या बीड जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरून धनंजय मुंडेंना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं त्यांच्या भरवशावर सुनेत्रा पवारांनी पत्रकार परिषदेत मौन बाळगणं कितपत योग्य आहे? याच पत्रकार परिषदेत अजितदादा असते आणि हाच प्रश्न विचारला असता तर धनंजय मुंडे याच अर्विभावात बोलू शकले असते का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com