Fallen trees block roads in Mumbai after heavy rainfall, raising concerns over the impact of concrete roads on urban greenery and public safety. saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Tree Fall Crisis: मुंबईतील रस्त्यांच्या कडेची १ लाख ८५ हजार झाडं पडण्याचा धोका? वाचा नेमकं कारण आहे तरी काय?

Impact Of Cement Roads On Urban Trees In Mumbai: मुंबईत अवघ्या चार दिवसांत ७०० हून अधिक झाडे कोसळली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. काँक्रीट रस्त्यांमुळे झाडांच्या मुळांवर परिणाम होत असल्याचा तज्ज्ञांचा दावा. प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह.

Bharat Mohalkar

मुंबईत पाऊस तीन आठवडे उशिरा दाखल झाला. मात्र पहिल्या चार दिवसातच महापालिकेच्या उपाययोजनांची आणि नगर नियोजनाची पुरती पोलखोल केलीय. आधी चेंबूर, त्यानंतर आरे कॉलनी आणि कुर्ल्यातील फिनिक्स मॉल भागात झाडं पडून तीन जणांचा मृत्यू झालाय. एवढंच नाही तर चार दिवसात मुंबईत ७०० पेक्षा जास्त झाडं पडल्याचा प्रकार समोर आलाय. मात्र या झाडं पडण्याच्या घटनेला सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते कारणीभूत असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. सिमेंटचे रस्ते झाडांसाठी स्लो पॉयझन ठरत असल्याचं अभ्यासकांनी म्हटलं आहे.

फक्त पर्यावरण अभ्यासकच नाही तर एकमेकींच्या समोर उभे ठाकणाऱ्या मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचंही झाडं कोसळण्याच्या घटनांबाबत एकमत झालंय.  झाडं पडण्याच्या घटनेला सिमेंटचे रस्ते कारणीभूत असल्याचा दावा केलाय. एवढंच नाही तर याविरोधात रणशिंग फुंकण्याचा इशाराच पेडणेकर यांनी दिला आहे.

खरंतर २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी मुंबईतील 2050 किलोमीटरचे रस्ते कॉंक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी १५०० किलोमीटर रस्त्याचं काम पूर्ण किंवा प्रगतीपथावर आहे.

२०२२-२३

रस्ते काँक्रीटीकरणसाठी २२०० कोटी

२०२३-२४

रस्ते काँक्रीटीकरणसाठी २८२५ कोटी

२०२४-२५

रस्ते काँक्रीटीकरणसाठी ३२०० कोटी

२०२५-२६

रस्ते काँक्रीटीकरणसाठी ५१०० कोटी

२०२६-२७

रस्ते काँक्रीटीकरणसाठी ५२०० कोटी

मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी काँक्रिटचे रस्ते बनवले जात आहेत, पण हेच रस्ते आता मुंबईकरांचा जीव घेऊ लागले आहेत. जर वेळीच झाडांना या काँक्रिटच्या विळख्यातून मुक्त केलं नाही, तर येणारा पावसाळा मुंबईकरांसाठी आणखी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे सरकार आता तरी मुंबईकरांना सुरक्षित जीवन देण्यासाठी रस्त्याचं काँक्रीटीकरण धोरण बदलण्यात येणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय

मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी काँक्रिटचे रस्ते बनवले जात आहेत, पण हेच रस्ते आता मुंबईकरांचा जीव घेऊ लागले आहेत. मुंबईत रस्त्याच्या कडेला १ लाख ८५ हजार झाडं आहेत. आता काँक्रीटीकरणामुळे झाडांच्या मुळांचा श्वास गुदमरत असल्यानं ही या सगळ्याच झाडांवर आणि पर्यायाने मुंबईकरांच्या जगण्यावर संकट आल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे जर वेळीच झाडांना या काँक्रिटच्या विळख्यातून मुक्त केलं नाही, तर येणारा पावसाळा मुंबईकरांसाठी आणखी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे सरकार आता तरी मुंबईकरांना सुरक्षित जीवन देण्यासाठी रस्त्याचं काँक्रीटीकरण धोरण बदलण्यात येणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जगात सर्वाधिक पाऊस मुंबईत, 5 दिवसांत 920 मिमी पावसानं वाढवलं टेन्शन? समुद्राची पातळी वाढणार, मुंबई बुडणार?

मुंबईला उद्याही पावसाचा अलर्ट, बुधवारी शाळा-ऑफिस चालू की बंद? व्हायरल मेसेजबाबत BMCकडून मोठा खुलासा

4 महिन्यांपूर्वीच सिया-चेतनचं गुपचूप लग्न? व्हॉट्सअॅप चॅटमधून मोठं गूढ उकलणार?

राम मंदिरात 40 दिवसांत 70 वेळा चोरी, SITच्या अहवालात धक्कादायक खुलासे, बड्या धेंड्यांना वाचवण्याचा डाव?

Maharashtra News Live Update: धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT