

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात समुदाय आरोग्य अधिकाऱ्याच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली.
डॉ. संदीप हाडे यांनी १५ ऑगस्ट रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे राजीनामा दिला होता.
राजीनाम्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ
एका डॉक्टरनं आत्महत्या केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात घडलीय. तालुक्यातील गोहोगाव हाडे येथील मांडवा फॉरेस्ट आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यानं जीवन संपवलं. डॉ. संदीप हाडे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी उपकेंद्रात ध्वजारोहण केल्यानंतर हाडे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत राठोड यांच्याकडे राजीनामा दिला.
नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. संदीप हाडे यांनी गावातील घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कामाचा वाढता ताण, अपुऱ्या सुविधा आणि वरिष्ठांच्या कथित प्रशासकीय दबावामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेनेदेखील हा आरोप केलाय. दरम्यान या प्रकरणाची चार-पाच दिवसांत चौकशी करून सत्य समोर आणण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडले यांनी दिले आहे.. चौकशी निष्पक्ष न झाल्यास आंदोलन करू असा इशारा संघटनेने दिला आहे.
जिल्हाध्यक्ष, समुदाय आरोग्य संघटनेचे डॉ. मंगेश मुंढे या घटनेप्रकरणी म्हणाले की, मेहकर तालुक्यातील मांडवा फॉरेस्ट आरोग्य उपकेंद्रात डॉ. संदीप हाडे हे कार्यरत होते. कामाच्या मुल्यांकनासाठी येणाऱ्या एका कमिटीमुळे हाडे चिंतेत होते. भारतभरात एमकॉस कमिटीकडून कर्मचाऱ्यांच्या कामाचे मुल्यांकन केलं जातंय. मात्र या मुल्यांकनाचा ताण अधिकाऱ्यावर होतोय. ही कमिटी २२ तारखेला मुल्यांकनासाठी येणार होती.
यासाठी कामाची पूर्व तयारी करण्यात येत होती, ते वरिष्ठाच्या मते व्यवस्थित होत नव्हती, त्यामुळे डॉ. हाडे हे चिंतेत होते. त्यांना मानसिक ताण होता. आमच्याशी बोलताना ते नेहमी यावर चर्चा करत. चिंता करत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या ऑर्डरमुळे ते तणावात होत होते
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.