Shocking : १० दिवसांपासून पिकअप एकाच जागेवर, दुर्गंधी आल्यानंतर पाहिलं अन् पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली

Washim Crime News : वाशिमच्या रिसोड शहरातील स्मशानभूमीजवळ उभ्या पिकअपमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांकडून मृत्यूचे कारण आणि व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे.
Washim parked Max pickup vehicle found dead body
Washim parked Max pickup vehicle found dead body Saam tv
Published On
Summary
  • पिकअपमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

  • नागरिकांनी पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला

  • रिसोड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला

  • मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

मनोज जैस्वाल, वाशीम

वाशीममधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील रिसोड शहरात स्मशानभूमीजवळ उभ्या असलेल्या मॅक्स पिकअप वाहनामध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाहनातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड शहरातील स्मशानभूमीजवळ एक मॅक्स पिकअप गेल्या काही दिवसांपासून उभा होता. दरम्यान, मंगळवारी या वाहनातून असह्य दुर्गंधी येऊ लागल्याने काही नागरिकांनी वाहनाजवळ जाऊन पाहणी केली. त्यावेळी वाहनामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह असल्याचे निदर्शनात आले. हा प्रकार समोर येताच नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली.

Washim parked Max pickup vehicle found dead body
Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतदेह काही दिवसांपासून वाहनात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, संबंधित व्यक्तीचा मृत्यू अपघाती आहे की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, तसेच मृतदेह पिकअपमध्ये नेमका कसा आणि कुठून आणण्यात आला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Washim parked Max pickup vehicle found dead body
Ice Facial Benefits : बर्फानं फक्त १० सकेंद करा मसाज, महिनाभरात चेहरा काचेसारखा चमकेल, आईस फेशिअलचे ७ फायदे पाहाच

शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासह वाहनाचा मालक, वाहन येथे किती दिवसांपासून उभे होते आणि मृतदेह वाहनात कसा पोहोचला, या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे रिसोड शहरात चर्चेला उधाण आले असून, तपासातून या रहस्यमय मृत्यूमागील सत्य समोर येण्याची प्रतीक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com