रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील बुधल समुद्रकिनाऱ्यावर मासेमारीसाठी गेलेल्या चिपळूणच्या गोवळकोट परिसरातील दोन तरुणांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सलीम पटेल आणि जावेद सुर्वे अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघेही बुधल किनाऱ्यावरील खडकांवर फिशिंग रॉडच्या सहाय्याने मासेमारी करत असताना अचानक आलेल्या मोठ्या लाटांच्या तडाख्यात समुद्रात ओढले गेले. स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला असून, या घटनेने गोवळकोट परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेचा पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील लाहमेमाडी येथे शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात टायर जाळून निषेध केला. 2025-26 चा हेक्टरी 17,500 रुपये पिकविमा देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळावा या मागणीसाठीजागर प्रतिष्ठानचे चौथ्या दिवस असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावरती येत आता रस्ता रोको आंदोलन करत टायर जाळून निषेध व्यक्त केला आहे. मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले.
मुंबई गोवा महामार्गाचे काम तातडीने करणार
गणेशोत्सवावापूर्वी महामार्ग सुस्थितीत आणणार
गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावी येतील त्यांच्यासाठी रस्ता सुस्थितीत आणणार
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली..
अंतरवाली सराटीत उपचार सुरू,अशक्तपणा आणि ताप आल्याने सलाईनद्वारे उपचार...
कालच घेतला होता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज , तर तब्येत ठीक नसल्यामुळे प्रस्तावित मराठवाडा दौरा देखील मनोज जरांगे यांनी केला रद्द...
पश्चिम महाराष्ट्राचा दौऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर मधील रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र काल त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला...
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील लाहमेमाडी येथे शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात टायर जाळून निषेध केला. 2025-26 चा हेक्टरी 17,500 रुपये पिकविमा देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळावा या मागणीसाठीजागर प्रतिष्ठानचे चौथ्या दिवस असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावरती येत आता रस्ता रोको आंदोलन करत टायर जाळून निषेध व्यक्त केला आहे. मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘ह’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाला केलेली विद्युत रोषणाई काढताना एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राहुल साबळे (वय ४३, रा. विजयनगर, काळेवाडी) असे मृत कामगाराचे नाव असून, ते ‘पार्वती इलेक्ट्रिकल्स’ या कंपनीमध्ये कामाला होते. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
एक धक्कादायक आणि प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणाची बातमी बीड मधून आहे.. एका नव्या आईच्या आनंदावर रुग्णालयातील कथित हलगर्जीपणाने घाला घातल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आलाय. संध्या सूरज गायकवाड, वय अवघं 19 वर्ष 1 ऑगस्ट रोजी बीडच्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर सीझर शस्त्रक्रिया झाली. चार दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आलं. मात्र, त्यानंतर संध्यांना तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. खासगी रुग्णालयातील तपासणीत पोटात अनोळखी वस्तू असल्याचं समोर आलं आणि पुढे पुण्यातील ससून रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यानंतर पोटातून हातमोजे आणि कागदी रुमाल काढण्यात आल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
लंडनमधील भाषणातील वक्तव्यावरून हा खटला दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील बुधल समुद्रकिनाऱ्यावर मासेमारीसाठी गेलेल्या चिपळूणच्या गोवळकोट परिसरातील दोन तरुणांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
सलीम पटेल आणि जावेद सुर्वे अशी मृत तरुणांची नावे आहेत.
मराठा समाजातील महिला व मुलींबाबत आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले.
अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास
दिपकेकडून शिक्षकावर कारवाईची मागणी
भाजपा किसान मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर
उपाध्यक्षपदी रचना गहाणे, दादा सातव, अशोक खेडकर आदींची नियुक्ती
यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यातून वगळं
यवतमाळ जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत नाही
आठ महिन्यात 145 शेतकऱ्यांनी जिल्ह्यात आत्महत्या केल्या
या सगळ्या प्रश्नावर काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर
रेशनिंगवर निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा
कुर्डुस गावातील महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
पुरवठा अधिकाऱ्यांसमोर ठेवले तांदळाचे नमुने
भाजपा किसान मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर
उपाध्यक्षपदी रचना गहाणे, दादा सातव, अशोक खेडकर आदींची नियुक्ती
शेत जमिनीच्या वादातून दोन गटात वाद आणि शिवीगाळ गेवराई तालुक्यातील आनंदवाडी येथील घटना.
मारहाण करणारा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कुटुंबीयांची तलवाडा पोलीस ठाण्यात धाव.
आतापर्यंत तलवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही आम्हाला न्याय मिळावा संगीता हातागळे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी.
मालमत्ता करात करवाढ सुचवितांना निवासी मालमत्तांच्या करात १२ टक्के, तर बिगर निवासी मालमत्तांच्या करात तब्बल २० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे. यातून महापालिकेला सुमारे १०४.६७ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल अपेक्षित धरण्यात आले आहे.
बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार
गृहसंकुलातील 750 कुटुंब धास्तावले
सोसायटी अस्तित्वातच नसल्याचा खोटा अहवाल सादर केल्याचा रहिवाशांचा आरोप
मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या..
जिल्ह्यातील आरोग्य विभागात खळबळ...
कामाचा ताण अन् प्रशासकीय दबावामुळे टोकाचे पाऊल, चौकशीची मागणी.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेला आज हायकोर्टाने जामीन मंजूर केला
याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुप्रीम कोर्टात जाणार
यवतमाळ जिल्ह्यात गत पंधरा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असताना अचानक जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली,त्यामुळे शेतातील पीकांना जीवनदान मिळाला असून या पावासामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पुढाकाराने लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक
विविध राजकीय पक्षांचे नेते आणि विविध क्षेत्रांत काम करणारे सामाजिक कार्यकर्ते बैठकीला उपस्थितीत
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर पुण्यातील वाहतूक समस्यांचा पाढा
वाहतूक कोंडी, हॉकर्स आणि अपघातांवर उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा
विविध समस्यांवर काम करण्यासाठी सल्लागार समिती नेमण्याचा निर्णय
सल्लागार समितीकडून पुढील १५ दिवसांत उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना
पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सर्व संबंधित घटकांना सोबत घेऊन काम करण्यावर भर
नवापूर नगर परिषदेच्या 93 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेमुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने, ही योजना रद्द करावी या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी नवापुरात जोरदार निषेध मोर्चा काढला. पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभेची पूर्वपरवानगी न घेतल्याचा आणि शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.पिंपळनेर चौफुलीवरून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. रंगवली धरणाऐवजी नवापूर शहरासाठी उकाई धरणातून पाणी योजना मंजूर करावी, अशी प्रमुख मागणी करत ग्रामस्थांनी तहसीलदार यांना निवेदन दिले. प्रशासनाने ही योजना रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठा समाजाच्या महिलांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक झालाय. मात्र आता वाघमारे यांनीही थेट मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय. बीडच्या गेवराईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.. विलास घुले यांच्या पत्नीने विषारी द्राव्य प्राशन केलं, त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेल्या महिलांबाबत जरांगेच्या लोकांनी केलेल्या वक्तव्यावर वाघमारे यांनी सवाल उपस्थित केलाय. तुमच्या महिलांवर बोलल्यानंतर तुम्हाला राग येतो, मग आमच्या माता-माऊलींबद्दल बोलल्यानंतर आम्हाला राग येऊ नये का? असा सवाल त्यांनी केलाय. अनावधानाने माझ्याकडून महिलांविषयी चुकीचं वाक्य गेलं मात्र त्यानंतर जरांगेची झालर महाराष्ट्रभर माझ्या विरोधात उठली..
नगर–मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात राहुरी शहरात वकील संघाने रास्तारोको आंदोलन करत रस्ता दुरुस्तीची मागणी केलीय.. विशेष म्हणजे भर पावसात वकिलांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं.. कायद्याची लढाई लढणारे वकील आता महामार्गाच्या दुरुस्तीसाठी रस्त्यावर उतरल्याने या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे..
- नाशिकरोडमध्ये सुमित पगारे हत्या प्रकरणात १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पूर्ववैमनस्य आणि ड्रग्स पेडलिंग वर्चस्वाच्या वादातून दोन गोळ्या झाडून सुमित पगारे याची रविवारी संध्याकाळी हत्या करण्यात आली होती. नाशिकरोड पोलिस ठाण्यात १४ संशयितांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून अवघ्या २४ तासांत १२ संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या असून मुख्य गोळीबार करणारा संशयित आणि आणखी एका आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. १४ आरोपींमध्ये १० गुन्हेगारांची जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलंय. २०२३ च्या एका गुन्ह्यात हे आरोपी जेलमध्ये अटकेत होते. नाशिकरोड पोलिस फरार आरोपींचा शोध घेतायत.
वंदे मातरम्'च्या सन्मानासाठी मी १०० वेळा वेडी व्हायला तयार आहे! राष्ट्रीयगानाचा अपमान सहन न झाल्याने सोनिया गांधींना पुस्तक पाठवले, तर विजय वड्डेट्टीवार माझ्यावर कौटुंबिक चिखलफेक करत आहेत. न्यायालयात निर्दोष सुटलेल्या विषयावर खोटे बोलून स्वतःचे वैचारिक दारिद्र्य दाखवू नका. - चित्रा वाघ
धाराशिवच्या कळंब तालुक्यातील सातेफळ येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत १९८८ साली बांधलेली आहे.या इमारतीची अवस्था अक्षरशः धोकादायक झाली आहे त्यामुळे विद्यार्थी जिव मूठीत घेवुन शिक्षण घेत आहेत.
पुण्यात आज रात्रीपासून जमावबंदी आदेश लागू
पुणे शहरात 14 दिवसांसाठी जमावबंदी आदेश
18 ऑगस्ट रात्री एक पासून ते 31 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत आदेश असणार
याच काळात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची पुण्यात विद्यार्थ्यांसोबत छात्रो की गुंज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी पोलीस देणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
आसावरी सोसायटीतील पाण्याची तीव्र टंचाई आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी आज सिडको भवनावर धडक मोर्चा काढला. 'आसावरीकरांची एकच गर्जना - पाण्याचा गंभीर प्रश्न मिटवा', असे फलक हातात घेत शेकडो रहिवासी या मोर्चात सहभागी झाले होते.
नवनाथ वाघमारे यांच्या पोस्टरला जोडे मारत व्यक्त केला निषेध
शहरातील चार हुतात्मा चौकात नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात अभिनव संस्थेकडून महिलांची जोरदार निदर्शने
नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील मुलींबाबत केलं होतं आक्षेपार्य वक्तव्य
नवनाथ वाघमारे वर गुन्हा दाखल करा अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू आंदोलक महिलांचा इशारा
शिवसेना शिंदे गट करणार खड्ड्यांचा पंचनामा
शहर खड्डेमुक्त आहे की खड्डेयुक्त आहे पहा जरा
लहान मुलांची सायकल पण पाऊस पडल्यावर चिखलातून न्यावी लागते
शहरात पुणे महापालिकेच्या कारभाराचा चिखल झाला आहे
मोर्चात भाजप आमदार अमित गोरखे हे देखील साहभागी झाले आहेत. या मोर्चामध्ये पुणे पिंपरी चिंचवड आणि परिसरातील मातंग समाजाचे बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.. अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ हा मोर्चा सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण यांच्या वतीने काढण्यात आला आहे.
डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याला जामीन मिळाला असून जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती मिळालीये.
मलकापूर आगारात रात्री च्या सुमारास एका विकृत इसमाने लोखंडी रॉडच्या सहाय्याने उभ्या असलेल्या पाच एसटी बसच्या समोरच्या काचा फोडल्या. सुरक्षा रक्षकाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने रक्षकावर रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांना देण्यात आली.
साखरपा-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दख्खनजवळ दरड कोसळल्याची घटना .
रस्ता रुंदीकरणादरम्यान अर्धवट कापलेल्या डोंगराचा भाग,माती आणि मोठे दगड थेट रस्त्यावर आल्याने या मार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद .
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही..
सध्या जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील मलबा आणि दगड हटवण्याचे काम पूर्ण लवकरच वाहतूक सुरू होणार
हडपसर मांजरी येथील आदिवासी मुलाच्या वसतिगृह येथे उपोषण
गडचिरोलीमध्ये साप चावून मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला १ कोटी ची मदत द्या
राज्यातील प्रत्येक आदिवासी आश्रम शाळेचा १० कोटी रुपये विमा उतरवावा
६ दिवसांपासून विद्यार्थिनी सोडल अन्न
५ ऑगस्ट चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी
- १३ ॲागस्टपासून नागपुरातील आदिवासी विकास विभागाच्या विभागीय कार्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या आंदोलन सुरू आहे
- आदिवासी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी २६ वर्षे वयाची मर्यादा हटवावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन
- गुरुवारी दुपारी आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु झालं, आज सहाव्या दिवशीही विद्यार्थी आदिवासी विकास कार्यालयात बसून आहेत
सी जे पी चे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अभिजीत दिपके यांनी लिंबाळा एमआयडीसी शाळेला भेट दिली होती या शाळेमध्ये मुख्याध्यापक दारू पिऊन वर्गातच झोपत असल्याचा व्हिडिओ पुढे आला होता.
त्यानंतर अभिजीत दिपके यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने कार्यवाही करा अशा सूचना दिल्या होत्या प्रशासनानs या मुख्याध्यापकावरती निलंबनाची कार्यवाही केली.
आता याच शाळेत भेट देण्यासाठी पुन्हा एकदा अभिजीत दिपके हिंगोली मध्ये दाखल झाले आहेत
अन्नत्याग आंदोलन सुरू असल्याने विद्यार्थी झाला अशक्त
तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल होत
काल रात्री त्याला रुग्णालयात दाखल केल्यावर आज सोडण्यात आलं आहे
फडणवीसांना पुन्हा येण्यासाठी आमदार फोडावे लागले
आज ठाकरेंच्या बाजूने युक्तीवाद संपणार
खटला ऐतिहासिक असल्याने निकालाला वेळ लागेल
काही वेळापूर्वी नवनाथ वाघमारे यांच्या गेवराई मध्ये निघालेल्या मिरवणुकीवरून गंगाधर काळकुटे यांनी काही प्रश्न उपस्थित करत नवनाथ वाघमारे यांना इशारा दिला आहे. मराठा मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील महिला आणि मुलींच्या भावना दुखावलेल्या आहेत, नवनाथ वाघमारेवर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून त्याला पोलिसांनी अटक करणं गरजेचं होतं मात्र तो फिरतोय त्याला बीडमध्ये आणि महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत का? , त्याचे उदातीकरण करायला चालू आहे, कारवाई होणार नसेल तर मराठा स्टाईलने उत्तर दिले जाईल, त्याचं तोंड काळ करून गाढवावरून मिरवणूक काढू असं मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांनी म्हटल आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे.. शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि गल्लीबोळांमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.. शहरातील खडकी भागात दोन वळूंमध्ये अचानक तुफान झुंज झाली.. भररस्त्यात सुरू झालेल्या या झुंजीमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.. हे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.. अखेर स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान दाखवत धैर्याने या दोन्ही बैलांना हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला..
शिरूर तालुक्यातील पिंपळे धुमाळ येथे चार वर्षीय बालकाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. देवांश विशाल धुमाळ हे बालक सोमवारी दुपारी एक वाजता बेपत्ता झाले होते. दिवसभर शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सलाईबन येथे रानभाजी महोत्सव उत्साहात पार पडला. तरुणाई फाउंडेशन, खामगावच्या वतीने आयोजित या महोत्सवात २२ प्रकारच्या पारंपरिक रानभाज्यांच्या पदार्थांची मेजवानी देण्यात आली. केना-आघाडा भाजी, मोहाची पुरणपोळी, शेवग्याची पुरी, भादली भात, गुळवेलीची चटणी आणि कुरडूची भाजी अशा विविध पदार्थांचा उपस्थितांनी आस्वाद घेतला. रानभाज्यांचे पौष्टिक महत्त्व आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासह मान्यवरांनी महोत्सवाला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले...
गडचिरोली मध्ये साप चावून मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला १ कोटी ची मदत द्या
राज्यातील प्रत्येक आदिवासी आश्रम शाळेचा १० कोटी रुपये विमा उतरवावा
६ दिवसांपासून विद्यार्थिनी सोडल अन्न
५ ऑगस्ट चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चाकण एमआयडीसी परिसरातील खड्ड्यांची पाहणी करून तेथील उद्योजकांची संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर आज आदित्य ठाकरे त्यानंतर आज आदित्य ठाकरे हिंजवडी आयटी पार्क आणि तेथील एमआयडीसी परिसरातील पाहणी करणार आहेत. चाकण सारखेच मोठ्या प्रमाणात हिंजवडी आयटी पार्क परिसरात देखील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अरुंद रस्ते असते आणि रस्त्यावर पडलेल्य खड्ड्यांमुळे हिंजवडी मान आणि मारुंजी या आयटी पार्क परिसरामध्ये दर दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आदित्य ठाकरे आज दुपारी या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहेत.
अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूल मधील धक्कादायक घटना..
चिखलदरा तालुक्यातील कारंजखेडा येथील इयत्ता अकरावीचा विद्यार्थी राजेश बाबू बेठेकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे
अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोठ्या घरफोडीचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने पर्दाफाश केला आहे. तब्बल ४९८ ग्रॅम सोने आणि दोन लाख रुपये रोख चोरीला गेल्याच्या या प्रकरणात अकोला येथील विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल ७२ लाख २७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुमारे २०० सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या तपासानंतर पोलिसांना हे यश मिळाले. पुढील तपास नागपुरी गेट पोलीस आणि गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
रायगडमधील दिघी बंदराच्या प्रस्तावित विस्तार प्रकल्पाला पर्यावरण विषयक जनसुनावणी दरम्यान मच्छीमारांनी जोरदार विरोध केला. तब्बल 42 हजार 500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे पारंपरिक मासेमारी क्षेत्र आणि समुद्रातील सागरी परिसंस्थेवर परिणाम होण्याची भीती मच्छीमारांनी व्यक्त करण्यात आली. परिसरातील हजारो मच्छीमार बांधव, भगिनी यावेळी उपस्थित होते.
धाराशिवच्या कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा,डॉक्टरांची उपलब्धता, रुग्णांना वारंवार केले जाणारे रेफर तसेच रात्रीच्या वैद्यकीय सेवा बाबतच्या तक्रारी वाढल्या असुन या पार्श्वभूमीवर धाराशिव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले.दरम्यान यावेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून अधिकाऱ्यांची बैठक घेतली ज्यांना नोकरी करायची नाही ज्यांना स्वतःचे खाजगी हॉस्पिटल चालवायचे आहे,त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा द्यावा मात्र सरकारी रुग्णालयात राहून रुग्णसेवेत हलकर्जीपणा खपवून घेणार नाही असे खडे बोल आमदार कैलास पाटील यांनी प्रशासनाला सुनावले. आहेत.रुग्णांच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारीवरून कैलास पाटलांनी बैठक घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
चाकण औद्योगिक वसाहतीतील खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या अभावाविरोधात आता स्थानिक तरुणही मैदानात उतरलेत. जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक तरुणांकडून आजपासून चाकणमध्ये साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
तुळजाभवानी मंदिरात नागपंचमीचा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. नागपंचमीनिमित्त मंदिरातील होमकुंडासमोर नागदेवतेची पूजा करण्यासाठी सकाळपासूनच स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.प्रथापरंपरेनुसार होमासमोर भवानी-शंकराचा पितळी नागफणा मांडण्यात आला होता. त्यासमोर चिखलाची नागदेवता तयार करून तिची पूजा करण्यात आली. महिलांनी नागदेवतेला दूध,लाह्या तसेच उकडलेले कानवले अर्पण करून पूजा केली.नागपंचमीच्या निमित्ताने सायंकाळी महिलांनी मंदिर परिसरात फेर,भुलई आदी पारंपरिक खेळ खेळून उत्साहात नागपंचमी साजरी केली.प्रथेनुसार सायंकाळी ५ ते ६ या वेळेत एक तास मंदिरात पुरुषांना प्रवेश बंद ठेवण्यात आला होता.
अंबरनाथमध्ये अवघ्या काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला नाल्यावरील पूल अवजड ट्रकच्या वजनामुळे अक्षरशः तुटल्याची घटना समोर आली आहे. अंबरनाथ पूर्वेतील होलार सोसायटी आणि यशवंत सोसायटी परिसरात हा प्रकार घडला.
पशुपालकांना नैसर्गिक आपत्ती, साथीचे रोग, अपघात किंवा इतर कारणांमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत पशुधन विमा योजना राबविण्यात प्रशासकीय व आर्थिक मंजुरी दिली असून यासंदर्भातील आदेश राज्य शासनाचे महासचिव नि.भा. मराळे यांनी काढले आहे या निर्णयामुळे राज्यातील पशुपालकांना दिलासा मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.